MPSC Mains 2022: दुय्यम सेवा अराजपत्रित गट मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून () महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी एमपीएससीने वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले. एमपीएससीकडून चार सप्टेंबरला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेसाठीच्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर एक २२ जानेवारीला, पोलीस उपनिरीक्षक पेपर दोन २९ जानेवारीला, सहाय्यक कक्ष अधिकारी पेपर २ हा ५ फेब्रुवारीला आणि राज्य कर निरीक्षक पेपर २ ची परीक्षा १२ फेब्रुवारीला होणार आहे. ही माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. हे परिपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षेची सविस्तर अधिसूचना वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vUoQpq
via IFTTT

Post a Comment

0 Comments