MPSC Recruitment 2021: एमपीएससीतर्फे पुन्हा बंपर भरती, जाणून घ्या डिटेल्स

Recruitment 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे.यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एमपीएससीतर्फे या पदभरतीअंतर्गत विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यात येणार आहेत. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एमपीएससीतर्फे ट्विट करुन याचा तपशील देण्यात आलाय. पदभरतीचा तपशील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील ९ पदांवरील भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात आयोगाच्या वेबसाइटवर जाहिरात (जाहिरात क्रमांक १०७ /२०२१) प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा करीता काही पदे भरली जाणार आहेत. यानुसार प्राध्यापक पदाच्या ५ जागा, सहयोगी प्राध्यापक पदाच्या १३ जागा आणि सहायक प्राध्यापक पदाच्या १७ जागा भरण्यात येणार आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (१०८/२०२१ ते १४२/२०२१) प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत सातारा, अलिबाग, नंदुरबार व सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रशासकीय विभागात ही भरती होणार आहे. याअंतर्गत प्रशासकीय अधिकारी, गट-ब संवर्गातील ४ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासंदर्भात आयोगाच्या वेबसाइटवर जाहिरात (१४३/२०२१ ते १४६/२०२१) प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता ३९० जागांवर होणार भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एकूण २९० रिक्त पदे भरली जाणार होती. आता ही पदसंख्या वाढविणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार एकूण १०० पदे वाढविली जाणार आहेत. त्यामुळे आता २९० ऐवजी ३९० पदांसाठी ही भरती होणार आहे. ही परीक्षा २ जानेवारीला होणार आहे. विविध पदांच्या भरती प्रक्रियेत आधीच विलंब झाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते. पण आता पदभरतीमध्ये वाढ केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DoejFz
via IFTTT

Post a Comment

0 Comments