NEET PG 2021 स्कोअरकार्ड आज होणार जारी; कसे कराल डाऊनलोड...जाणून घ्या

राष्ट्रीय परीक्षा मंडळ म्हणजेच नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स (NBE) शनिवार ९ ऑक्टोबर २०२१ रोजी नीट पदव्युत्तर परीक्षेचे (NEET PG 2021) स्कोअरकार्ड जारी करणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार natboard.edu.in किंवा nbe.edu.in वर स्कोअरकार्ड तपासू शकतात. क्वालिफायिंग कटऑफ यापूर्वी २८ सप्टेंबर २०२१ रोजी निकालासह घोषित करण्यात आले होते. बोर्डाने यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर रँकची यादी जाहीर केली होती . आता इच्छुक उमेदवार त्यांचे वैयक्तिक स्कोअरकार्ड डाऊनलोड करू शकतात. NEET PG 2021 स्कोअरकार्ड: डाऊनलोड कसे करावे १: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या २: NEET PG 2021 टॅबवर क्लिक करा ३: नवीन पृष्ठावर, स्कोरकार्ड दुव्यावर क्लिक करा ४: क्रिडेन्शिअल्स भरा आणि सबमिटवर क्लिक करा ५: स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल अखिल भारतीय कोटा (AIQ) गुणवत्ता यादी लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या यादीत त्या उमेदवारांच्या नावांचा समावेश असेल जे, त्यांच्या NEET PG 2021 रँकनुसार, ५० टक्के ऑल इंडिया कोट्यातील जागांसाठी पात्र आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी समुपदेशन वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) द्वारे केले जाईल. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील संस्थांमध्ये प्रवेशासाठी उमेदवारांना त्यांच्या संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित समुपदेशन सत्रांमध्ये उपस्थित राहावे लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FuSSos
via IFTTT

Post a Comment

0 Comments