Also visit www.atgnews.com
RTE मधील २५ हजार जागा रिक्तच; प्रवेश प्रक्रिया २५ ऑक्टोबरपर्यंत होणार पूर्ण
म. टा. प्रतिनिधी, पुणे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत () राज्यातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असून, २५ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी आता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. य़ेत्या २५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. सुरू होऊन चार महिने उलटल्यानंतरही ही प्रक्रिया सुरूच आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी दोन लाख २२ हजार ५८४ पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केले. या मुलांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आल्यानंतर, त्यामध्ये ९७ हजार ९५९ मुलांना प्रवेश जाहीर झाले. या मुलांना प्रवेशासाठी ११ ते ३० जूनची मुदत देण्यात आली होती. त्यापैकी ६८ हजार ९५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. उर्वरित रिक्त जागांवर प्रवेशासाठी मुदतवाढ देऊन पुरेशा संधी दिल्यानंतर प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. या विद्यार्थ्यांसाठी पहिली फेरी राबविल्यानंतर, आता दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत दुसरी प्रतिक्षा फेरी संपवून, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा शालेय़ शिक्षण विभागाचा मानस आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असून, मुलांचे प्रवेशाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत २५ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. पुण्यात दहा हजार प्रवेश पुणे जिल्ह्यातील ९८५ शाळांमध्ये प्रवेशासाठी १४ हजार ७७३ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ५५ हजार ८१३ पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ हजार ५६७ मुलांना प्रवेश जाहीर झाले. त्यापैकी १० हजार ८६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही तीन हजार ९०९ जागा रिक्त असल्याची माहिती 'आरटीई'च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Btp0WP
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments