AICTE: कोणत्या स्कॉलरशिपसाठी कधीपर्यंत कराल अर्ज? जाणून घ्या

AICTE Schemes 2022: टेक्निकल कोर्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) तर्फे मिळविण्याची संधी आहे. एआयसीटीइने आपल्या विविध स्कॉलरशिप २०२२ साठी अर्ज मागविले आहेत. वेगवेगळ्या स्तरावर कोर्सची तयारी करणारे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करु शकतात. एआयसीटीईची अधिकृत वेबसाइट aicte-india.org वर जाऊन यासाठी अर्ज करावा लागणार आहे. एआयसीटीईने ट्विट करुन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. संस्थेकडून बनेल विद्यार्थी ओळखपत्र AICTE ने सर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना या मुदतीपूर्वी एआयसीटीईच्या वेबसाइटला भेट देऊन संबंधित शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा लागेल. विद्यार्थी ओळखपत्राशिवाय अर्ज भरू शकणार नाही. विद्यार्थ्यांना आयडी तयार करण्यासाठी त्यांच्या शिक्षण घेत असलेल्या संस्थेकडे अर्ज करावा लागेल. कोणत्या शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत अर्ज करू शकतो? AICTE पीजी स्कॉलरशिप २०२२ - ३१ डिसेंबर २०२१ AICTE प्रगती स्कॉलरशिप २०२२ - ३० नोव्हेंबर २०२१ AICTE सक्षम स्कॉलरशिप २०२२- ३० नोव्हेंबर २०२१ AICTE स्वनाथ स्कॉलरशिप २०२२ - ३० नोव्हेंबर २०२१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर, सर्व अर्जांची एआयसीटीई संलग्न संस्थांद्वारे पडताळणी केली जाईल. १५ जानेवारी २०२२ ही AICTE पीजी स्कॉलरशीप अर्ज पडताळणी करण्याची अंतिम तारीख आहे. तर इतर सर्व AICTE स्कॉलरशिप योजनांसाठी अर्ज पडताळणीची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२१ आहे. कोणत्या शिष्यवृत्तीत किती रक्कम ? एआयसीटीई पीजी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, विद्यार्थ्यांना दरमहा १२ हजार ४०० रुपये दिले जातात. ही शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी म्हणजे २४ महिने किंवा वर्ग संपेपर्यंत दिली जाते. स्वनाथ शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्याला वार्षिक ५० हजार रुपये दिले जातात. ही शिष्यवृत्ती प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्यांना ४ वर्षांसाठी, तर डिप्लोमा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना ३ वर्षांसाठी दिली जाते. सक्षम शिष्यवृत्ती योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे. तर प्रगती शिष्यवृत्ती ही विद्यार्थिनींसाठी आहे. या दोन्ही शिष्यवृत्ती योजनांतर्गत विद्यार्थ्यांना ५०-५० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनांबद्दल तपशील माहिती AICTE च्या वेबसाइटवर मिळू शकते. शिष्यवृत्ती देण्यात अडथळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीला अडथळे निर्माण झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळाली आहे आणि ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आहे, अशा विद्यार्थ्यांची माहिती अपडेट केली जात नसल्याने पुढील विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळवण्यास अडचणी येत असल्याचे ‘एआयसीटीई’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. तंत्रशिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘एआयसीटीई’कडून शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही शिष्यवृत्ती सुरू असते. परंतु, अनेकदा विद्यार्थी मधूनच शिक्षण सोडून देतात. शिष्यवृत्तीच्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडल्यानंतर त्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक सद्यस्थितीची माहिती तो शिकत असलेल्या संबंधित महाविद्यालयाने देणे गरजेचे आहे. परंतु, ही महाविद्यालये माहिती अपडेट करत नसल्याने अनेक अडथळे निर्माण होत असल्याचे ‘एआयसीटीई’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाविद्यालयांनी तातडीने शिष्यवृत्ती घेतलेल्या; पण शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती ‘एआयसीटीई’कडे सुपूर्द करावी, अशा सूचना ‘एआयसीटीई’कडून देण्यात आल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qaJrW0
via IFTTT

Post a Comment

0 Comments