Also visit www.atgnews.com
तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे 'ई-लर्निग'द्वारे शिक्षणाचे धडे
पुणे : प्रत्यक्ष 'ऑफलाइन' शाळा सुरू झाल्या असल्या, तरी आता तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे आतापासूनच पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘ई-लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना धडे देण्यास सुरुवात केली आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अॅपद्वारे अभ्यासक्रम शिकवला जात असल्याने शाळेसह आता घरातही त्यांना धडे गिरविणे शक्य झाले आहे. जिल्ह्यातील ५२ हजारांहून अधिक विद्यार्थी 'ई-लर्निंगटद्वारे स्मार्ट शिक्षण घेत आहेत. पुणे जिल्ह्यात करोनाच्या संसर्गाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचू शकले नाही. ऑनलाइन शिक्षणाचा सर्वांना लाभ घेता आले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून ‘ई-स्कूल’ अॅपची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता इन्फोसिस कंपनीने स्पर्श संस्थेच्या मदतीने हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी अॅप कार्यान्वित करून विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अॅपची नोंदणी सुरू केली असून, त्याचा वापरही सुरू झाला आहे. ‘जिल्हा परिषदेच्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ई-स्कूल अॅपचा वापर सध्या सुरू आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरू असून, त्यानंतर पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी याचा उपयोग केला जाणार आहे. जिल्ह्यातील सहावी ते आठवीपर्यंतच्या ५२ हजार विद्यार्थ्यांकडून अॅपचा वापर सुरू आहे. अॅपद्वारे लॉग इन करणे, कोणत्याही शिक्षकाला परीक्षेचे पेपर अपलोड करणे, पेपर घेणे; तसेच विद्यार्थ्यांना शिकविता येईल. विद्यार्थ्यांना लेखी उत्तरपत्रिका अपलोड करता येईल. सध्या पालकांसह शिक्षकांच्या फोनमध्ये अॅप देण्यात आले आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ‘केद्र, राज्य सरकार, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण संस्था (एससीआरटी) यांच्याकडून प्रमाणित झालेले अभ्यासक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) मदतीने अॅपमध्ये घेण्यात आले आहेत. या अॅपमुळे खासगी क्लासेस, संस्थांच्या शिक्षणपद्धतीच्या धर्तीवरच आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ पद्धतीने शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘डाएट’ संस्थेच्या माध्यमातून किती विद्यार्थी शिकले, किती विद्यार्थ्यांना ज्ञान अवगत झाले, आणखी किती विद्यार्थ्यांना शिकविण्याची गरज आहे, याचाही आढावा घेता येणार आहे,’ असेही आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी डॉ. ज्योती परिहार म्हणाल्या, ‘पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओंचा या अॅपमध्ये समावेश केला आहे. जिल्ह्यातील ९३६ शिक्षकांचे व्हिडिओ अॅपवर देण्यात आले आहेत. आर्थिक निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे अॅप विकसित करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे.’ ‘ई-लर्निंग’अॅपद्वारे शिक्षण सुरू असले तरी ऑफलाइन शिक्षणही सुरू राहील. तिसऱ्या लाटेच्या भीतीने हा प्रयोग राबविला जात आहे. यामुळे जगभरातील विविध प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना घेणे शक्य होणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना ‘ई-लर्निंग’चे शिक्षण घेण्याची सवय लागावी हा या मागचा हेतू आहे. - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ‘ई-स्कूल’ अॅपचा फायदा - जिल्ह्यातील दोन लाख ३४ हजार विद्यार्थ्यांना फायदा. - प्रशिक्षित शिक्षक व अॅनिमेटेरद्वारा निर्मित ऑडिओ व्हिज्युअल अभ्यासक्रम ऑफलाइन उपलब्ध - इंटरनेट सुविधा नसतानासुद्धा वापरता येणार - अवघड विषयाचे सोप्या भाषेत सादरीकरण - एकाग्रता व आत्मविश्वास वाढण्यास मदत - विद्यार्थ्यांच्या शालेय गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत - समजण्याकरिता, लक्षात ठेवण्याकरिता आणि उजळणीकरिता सहज सोपे - आनंददायी शिक्षणाकरिता आणि स्वाध्यायाकरिता अत्यंत उपयोगी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/300hvZW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments