Also visit www.atgnews.com
स्टाफ सिलेक्शनतर्फे २५ हजारहून जास्त रिक्त जागांवर भरती, जाणून घ्या डिटेल्स
Constable (GD) 2021: एसएससी भरती परीक्षा २०२१ साठी अर्ज केलेल्या आणि परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वपूर्ण माहिती आहे. कर्मचारी निवड आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), राष्ट्रीय तपास संस्था (NIA), सचिवालय सुरक्षा दल (SSF) मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन (जनरल ड्युटी) च्या एकूण २५ हजार २७१ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षेचे शहर आणि उमेदवारांच्या अर्जाचा स्टेटस जाहीर करण्यात येत आहे. स्टाफ सिलेक्शन कमीशन-दक्षिण क्षेत्रातर्फे याची सविस्तर माहिती जाहीर करण्यात आली आहे. या स्टेप्स फॉलो करुन पाहा डिटेल्स स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या प्रादेशिक कार्यालयाद्वारे एसएससी जीडी परीक्षेबाबतची महत्वाची अपडेट्स जाहीर करण्यात आली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर अॅक्टीव्ह केलेल्या लिंकद्वारे उमेदवार त्यांच्या संबंधित प्रदेशासाठी त्यांच्या परीक्षेची तारीख, वेळ, शहर आणि अर्जाची स्थिती तपासू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करावी लागेल. तसेच उमेदवारांना एसएससी जीडी कॉन्स्टेबल प्रवेशपत्र २०२१ देखील त्याच प्रक्रियेद्वारे आणि वेबसाइटद्वारे डाउनलोड करता येणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे कॉन्स्टेबल (जीडी) परीक्षेचे आयोजन १६ नोव्हेंबर २०२१ पासून केले जाणार आहे. ही परीक्षा १५ डिसेंबर २०२१ पर्यंत वेगवेगळ्या नियोजित तारखांवर घेतली जाणार आहे. एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा २०२१ ऑनलाइन सीबीटी (कॉम्प्युटर आधारित परीक्षा) माध्यमातून घेतली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GVibRh
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments