Government Job: भारतीय वायुदलात भरती; दहावी-बारावी उत्तीर्णांना संधी

2021: भारतीय वायु सेनेमध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने एचक्यू सेंट्रल एअर कमांड, एचक्यू ईस्टर्न एअर कमांड, एचक्यू साउथ वेस्टर्न एअर कमांड, एचक्यू सेंट्रल एअर कमांड, एचक्यू वेस्टर्न एअर कमांड, एचक्यू ट्रेनिंग कमांड और एचक्यू मेंटेनेंस कमांडमध्ये भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. ग्रुप सी सिविलीयन पदासाठी ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, पगार, वयोमर्यादा यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), कुक, अधीक्षक, सुतार, फायरमन आणि सिव्हिल मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या एकूण ८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. उमेदवारांनी आपले अर्ज नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून ३० दिवसांच्या आत म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत संबंधित एअर कमांड मुख्यालयाच्या पत्त्यावर पाठवणे गरजेचे आहे. एलडीसी पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रुप सी भरती जाहिरात (क्रमांक ०५/२०२१/डीआर) नुसार उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना इंग्रजीमध्ये टायपिंग ३५ शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग येणे गरजेचे आहे. मल्टी टास्किंग स्टाफसाठी उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. कुक आणि सुतार पदांसाठी, संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्रासह दहावी पास असणे आवश्यक आहे. तर अधीक्षक (स्टोअर) साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्रता आणि भरतीचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BShdkJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments