दिवाळीत वाया गेलेल्या सुट्ट्यांबाबत शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

Education Department: दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आलेल्या इतर सरकारी कामांमुळे ज्यांच्या सुट्ट्यांवर परिणाम झालाय त्यांच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यांना या सुट्ट्या नंतर घेता येणार आहेत. दिवाळीत शाळेत यावे लागल्याने अनेक शिक्षकांच्या सुट्ट्या वाया गेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर शासन स्तरावर पाठवपुरावा करण्यात येत होता. त्याला यश आले आहे. राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळांना सणानिमित्ताने २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबरपासून नियमित शाळा सुरु होणार आहेत. दरम्यान राज्यात १२ नोव्हेंबर राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षांच्या तयारीसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिवाळीत शाळेत यावे लागणार आहेत. त्यांना त्यांच्या सुट्ट्या नंतर घेता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या सुट्ट्यांवर परीणाम झालेल्यांना शासकीय नियमानुसार राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) झाल्यानंतर किंवा नाताळच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या सुट्ट्या घेता येणार आहेत. स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन या सुट्ट्यांचे समायोजन करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. त्यामुळे दिवाळी सुट्टीतील शिल्लक सुट्ट्या अन्य ठिकाणी योग्य कारणास्तव वापरता येणार आहेत. नाताळ किंवा गणेशोत्सव या काळात राज्यातील खासगी इंग्रजी माध्यमाच्यांच शाळांना सुट्टया असतात. काही ठराविक भागातील जि.प शाळांनाही सुट्ट्या दिल्या जातात. गणेशोत्सव काळात कोकणात तर नाताळवेळी मुंबई परिसरात सुट्ट्या दिल्या जातात. दरम्यान ११ नोव्हेंबरपासून सरसगट सर्व वर्ग सुरू करण्यापेक्षा तिसरी, पाचवी,आठवी आणि दहावीच्या वर्गातील विद्यार्थी शिक्षकांना दि.११ आणि १२ रोजी शाळेत बोलवून राष्ट्रीय संपादणूक चाचणी घेता येईल. नंतर या मुलांना सुट्टी देता येईल व स्थानिक नियोजनाप्रमाणे शाळा सुरू करता येतील यावर विचार सुरु आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3w9Xf3M
via IFTTT

Post a Comment

0 Comments