Also visit www.atgnews.com
... अन् आरीशच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला!
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : कोणालाही उपाशी न ठेवणाऱ्या मुंबई शहरात नोकरीच्या आशेने दाखल झालेला आरीश खान येथे येताच एका कापडाच्या दुकानात नोकरीला लागला. मात्र तेथे मिळणारा तुटपुंजा पगार आणि गावकडच्या जबाबदाऱ्या यामुळे आर्थिक गणित काही जुळत नव्हते. यामुळे पुढचे शिक्षण घेण्याचा विचार त्याने केला, मात्र शिक्षणासाठीही खिशात पैसे नव्हते. अशा परिस्थितीत निराश झालेल्या आरीश याला अखेर मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी मदत केली आणि त्याचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. हरयाणामधून आलेला आरीश हा दिव्यांग आहे. मुंबईतील एका कपड्याच्या दुकानात त्याला अवघ्या चार हजार रुपयांची नोकरी मिळाली. यामध्ये स्वत:च्या दोन वेळच्या जेवणाचा खर्च भागवून गावाकडे वृद्ध आईवडिलांना पैसे पाठवणे अशक्यच होते. शिक्षणाशिवाय चांगली नोकरी मिळणे शक्य नाही, हे काम करत असताना आरिशच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणासाठी पैसे लागतात. मात्र 'जिद्दीला पर्याय नसतो' या उक्तीचा प्रत्यय देत आरीश याने पुढील शिक्षण कसे घेता येईल, आपल्याला शिक्षणासाठी काही मदत मिळेल का, याची चाचपणी करण्यासाठी मोठ्या आशेने मुंबई विद्यापीठातील मुक्त व दूरस्थ विभाग म्हणजेच 'आयडॉल' गाठले. तेथे त्याची भेट 'आयडॉल'चे जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे यांच्याशी झाली. आरीशने आपली कैफियत माळाले यांना सांगितली. माळाले यांनी अधिसभा सदस्य अॅड. वैभव थोरात यांच्याशी संपर्क साधला आणि दूरध्वनीवरून थोरात यांनी या विद्यार्थ्याचे शुल्क भरण्याची तयारी दर्शवली, एवढेच नव्हे, तर तातडीने त्याचे पूर्ण शुल्कदेखील भरले आणि आरीशचा प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश निश्चित झाला. यापूर्वीही थोरात यांनी काही विद्यार्थ्यांचे शुल्क भरले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nVaXoG
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments