Also visit www.atgnews.com
टीईटी परीक्षेची प्रवेशपत्रे डाउनलोड करण्यात परीक्षार्थ्यांना अडचणी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: राज्यातील शिक्षकांच्या नियुक्तीकरिता आवश्यक असणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रवेशपत्रे डाउनलोड करण्यात परीक्षार्थ्यांना अडचणी येत आहेत. यासाठी राज्याने पुरविलेल्या लिंक कार्यान्वित होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी येत्या २१ नोव्हेंबरला होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे डाउनलोड करण्यासाठी २६ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. ती डाउनलोड करण्यासाठी २१ नोव्हेंबर म्हणजे परीक्षेच्या दिवसापर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याकरिता शासनाने लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सध्या अनेक परीक्षार्थी या लिंकच्या आधारे प्रवेशपत्रे डाउनलोड करीत आहेत. मात्र, हे करताना त्यांना अडचणी येत आहेत. अर्ज भरल्यानंतर परीक्षार्थ्यांना अर्ज क्रमांक देण्यात आला होता. तो आणि जन्मतारीख भरून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. मात्र, हे दोन्ही भरूनही प्रवेशपत्रे डाउनलोड करता आलेली नाहीत. या दोन्ही बाबी अवैध असल्याचे दाखवत आहेत. त्याशिवाय, शासनाने दिलेली लिंकच अॅक्टिव्ह नसल्याच्या तक्रारी परीक्षार्थ्यांनी केल्या आहेत. याआधी, ही परीक्षा तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या वेळापत्रकानुसार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत पहिला पेपर आणि दुपारी २ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत दुसरा पेपर घेण्यात येईल. MAHATET Admit Card: असे करा डाऊनलोड उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड २०२१ डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या पोर्टल वर जावे. नंतर होमपेजवरील प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या संबंधित लिंकवर क्लिक करावे. आता नव्या पेज वर उमेदवारांनी विचारलेली माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आदी भरून सबमिट करावे. यानंतर उमेदवार आपले स्क्रीनवर पाहू शकतात. अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट घ्यावे आणि सॉफ्ट कॉपी देखील सेव्ह करावी. महाराष्ट्र टीईटी २०२१ अॅडमिट कार्ड सह उमेदवारांनी त्यांचे एक छायाचित्र आणि फोटो आयडी देखील परीक्षेच्या वेळी सोबत बाळगावे. सन २०१८-१९ नंतर आता परीक्षा होणार आहेत. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता शिक्षणविभागाकडून वर्तविली जात आहे. टीईटी अनिवार्य इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टीईटी(TET) अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत आणि कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mP69k8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments