Also visit www.atgnews.com
CAT Exam 2021: 'या' निर्देशांचे पालन न केल्यास उमेदवारांना परीक्षा केंद्रावर बंदी
2021: कॅट परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. देशातील IIM सह नामांकित बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT-2021) च्या परीक्षेसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM ) ने महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. संस्थेतर्फे परीक्षेसंदर्भात महत्वाचे निर्देश अधिकृत वेबसाइट imcat.ac.in वर जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासोबतच निर्देश काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. याचे पालन न केल्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या महत्वाची कागदपत्रे 2021 प्रवेशपत्र. मूळ ओळखपत्र. फेस मास्क सॅनिटायझर आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र प्रवेशपत्रासोबत उमेदवाराचे फोटो ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. मतदार आयडी, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, कॉलेज आयडी यापैकी कोणतेही कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. याशिवाय केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तीन सत्रात परीक्षा स्लॉट १- सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत स्लॉट २- दुपारी १२.३० ते दुपारी २.३० पर्यंत स्लॉट ३- संध्याकाळी ४.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत महत्वाचे निर्देश A4 आकाराच्या कागदावर प्रवेशपत्र प्रिंट करा. उमेदवाराचा फोटो आणि सही स्पष्टपणे छापलेली असेल तरच प्रवेशपत्र वैध असेल. कॅट परीक्षा केंद्रावर पडताळणीसाठी देण्यापूर्वी प्रवेशपत्रावर दिलेल्या जागेवर फोटो चिकटवा. CAT कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT) मोडवर घेतली जाईल. उमेदवारांना प्रत्येक विभागासाठी ४० मिनिटे आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना ५३ मिनिटे २० सेकंद दिले जातील. वेळ पूर्ण झाल्यानंतर संबंधित सेक्शन आपोआप बंद होईल. कॅट २०२१ परीक्षेतील काही प्रश्न बहुपर्यायी प्रश्नांवर (MCQ) आधारित असतील तर काही नॉन एमसीक्यू आधारित प्रश्न असतील. उमेदवारांना एसएमएस आणि ईमेलवर रिपोर्टींगची वेळ मिळेल. त्यानुसार त्यांना परीक्षा केंद्रावर रिपोर्टींग करावे लागेल. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांना हातात मेटल डिटेक्टर लावले जाईल. उमेदवारांना फक्त कॅट २०२१ प्रवेशपत्र, फोटो ओळखपत्र, मास्क, सॅनिटायझर, आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र (असल्यास) सोबत ठेवण्याची परवानगी असेल. CAT परीक्षेचा नमुना IIM अहमदाबादतर्फे (IIM, Ahmedabad) २८ नोव्हेंबर रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी एकूण ७६ प्रश्न विचारण्यात आले होते. यंदा कॅटमध्ये ६४ ते ६८ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रश्न तीन भागात विचारले जातील. शाब्दिक क्षमता आणि वाचन आकलन, वाचन, परिमाणात्मक क्षमता आणि डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंगमधून प्रश्न येतील. प्रत्येक सेक्शन सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना ४०-४० मिनिटे दिली जाणार आहेत. अपंग व्यक्तींना (PH उमेदवार) प्रश्न सोडवण्यासाठी १३ मिनिटे २० सेकंदांचा अतिरिक्त वेळ मिळेल. प्रत्येक विभागातून २० ते २४ प्रश्न विचारले जातील. पेपरमध्ये मल्टिपल चॉइस आणि नॉन मल्टिपल चॉइस असे दोन्ही प्रश्न असतील. एमसीक्यूमध्ये निगेटिव्ह मार्किंगची असेल आणि नॉन MCQ मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. CAT 2021 Admit Card: असे करा डाऊनलोड स्टेप १ : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: आता नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. स्टेप ४: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: ते आता डाउनलोड करा. स्टेप ६: परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी त्याची प्रिंट आउट घ्या. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचे नाव, जन्मतारीख, अर्ज क्रमांक, श्रेणी, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता, कॅट २०२१ परीक्षेचा दिवस आणि शिफ्टच्या वेळेसह सर्व माहिती तपासून घेणे गरजेचे आहे. परीक्षेच्या दिवशी पाळल्या जाणार्या सर्व मार्गदर्शक सूचना प्रवेशपत्रावर देण्यात आल्या आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CZmlUK
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments