Also visit www.atgnews.com
Government Job 2021: बारावी पास असणाऱ्यांना पोस्टात काम करण्याची संधी
India : पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. इंडिया पोस्टने महाराष्ट्र सर्कलच्या २५७ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांना इंडियन पोस्टच्या () अधिकृत वेबसाइट dopsportsrecruitment.in वर ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र सर्कलसाठी () इंडिया पोस्टने प्रसिद्ध केलेल्या या रिक्त जागेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करायची असेल आणि तुमच्याकडे खेळाची पार्श्वभूमी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. इंडियन पोस्टच्या (India Post Recruitment 2021) नोटिफिकेशननुसार ही भरती क्रीडा कोट्यातील उमेदवारांसाठी आहे. उमेदवार २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये २५७ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. रिक्त जागांचा तपशील महाराष्ट्रातील इंडिया पोस्टने जारी केलेल्या भरती नोटिफिकेशननुसार, एकूण २५७ पदांसाठी ही भरती घेण्यात आली आहे. यामध्ये पोस्टल असिस्टंटसाठी ९३, शॉर्टनिंग असिस्टंटसाठी ९, पोस्टमनसाठी ११३ आणि एमटीएसाठी ४२ जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना dopsportsrecruitment.in वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. येथे भरती विभागात क्लिक करून उमेदवारांना पाहिजे त्या पदासाठी अर्ज करता येणार आहे. महत्वाच्या तारखा २८ ऑक्टोबर २०२१ रोजी भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध २८ ऑक्टोबर २०२१ पासून ऑनलाइन अर्ज सुरू २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार पात्रता आणि वयोमर्यादा पोस्टल असिस्टंट/पोस्टमन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी पास असणे आवश्यक आहे. पोस्टल असिस्टंट/पोस्टमनसाठी १८ ते २७ वर्षे आणि MTS साठी १८ ते २५ वर्षे इतकी वयोमर्यादा असणे गरजेचे आहे. एससी/एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षे, ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे, पीडब्ल्यूडी सामान्य वर्गासाठी १० वर्षे, पीडब्ल्यूडी एससी, एसटी उमेदवारांना १५ वर्षे, पीडब्ल्यूडी ओबीसीसाठी १३ वर्षे इतकी सवलत देण्यात येणार आह. पगाराचा तपशील या भरती नोटिफिकेशननुसार, पोस्टल असिस्टंट, शॉर्टनिंग असिस्टंटसाठी २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये पगार दिला जाणार आहे. तर पोस्टमन पदासाठी २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये पगार दिला जाणार आहे. यासोबतच इतर भत्ते दिले जातील. पदभरतीसाठी अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचून त्यानुसार अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास आणि दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायला हवी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3btSZCJ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments