UCEED २०२२ नोंदणी प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या अपडेट

UCEED 2022: दिल्ली, मुंबई, गुवाहाटी आणि हैदराबाद तसेच IITDM जबलपूर येथे असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs) द्वारे होणाऱ्या बॅचलर ऑफ डिझाईन (बी.डिझाइन) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यांसाठी महत्वाची बातमी आहे. देशातील नामांकित संस्थांमधून डिझाइनमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी अंडर-ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन (UCEED) द्वारे प्रवेश केला जाईल. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या UCEED २०२२ च्या अर्ज प्रक्रियेच्या तारखेबद्दल वेबसाइटवर अपडेट देण्यात आली आहे. आयआयटी मुंबईने परीक्षा पोर्टलवर जाहीर केलेल्या अपडेटनुसार, उमेदवार आता या परीक्षेसाठी ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही विलंब शुल्क भरावे लागणार नाही. या तारखेनंतर उमेदवार १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. आयआयटी मुंबईने यापूर्वी UCEED २०२२ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. तसेच विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर होती. UCEED 2022: नोंदणीसाठी स्टेप्स फॉलो करा स्टेप्स १ : UCEED च्या अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3j9K5OU जा . स्टेप्स २: होमपेजवर उपलब्ध असलेल्या 'रजिस्टर' टॅबवर क्लिक करा. स्टेप्स ३: नवीन पेज खुले झाल्यावर नोंदणीकृत प्रमाणपत्रे अपलोड करा आणि 'सबमिट' बटण दाबा. स्टेप्स ४: आता आवश्यक तपशील भरुन UCEED २०२२ अर्ज भरा. स्टेप्स ५: ऑनलाइन शुल्क भरा आणि भरलेला UCEED फॉर्म सबमिट करा. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट घ्या. महत्वाच्या तारखा: नियमित शुल्कासह ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख - ११ नोव्हेंबर २०२१ विलंब शुल्कासह ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख - १६ नोव्हेंबर २०२१ प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख - ८ जानेवारी २०२२ नंतर प्रवेशपत्रात बदल करण्याची शेवटची तारीख - १४ जानेवारी २०२२ (संध्याकाळी ५ वाजता) परीक्षेची तारीख - २३ जानेवारी २०२२ अंतिम उत्तरतालिका जाहीर - ३१ जानेवारी २०२२ निकालाची घोषणा - १० मार्च २०२२ UCEED परीक्षेबद्दल जाणून घ्या UCEED ही डिझाईन प्रवेश परीक्षा आहे, मुंबई, गुवाहाटी, दिल्ली, IITDM जबलपूर आणि हैदराबाद मध्ये BEDS प्रवेशास उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोजित केली जाते. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर आणि वर्षातून एकदा आपल्या देशातील २४ शहरांमध्ये घेतली जाते. २०२१ मध्ये बारावी किंवा त्याच्या समकक्ष किंवा २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार UCEED साठी अर्ज करण्यास पात्र आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3w56lyE
via IFTTT

Post a Comment

0 Comments