Also visit www.atgnews.com
Government Job: रोजगार भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये विविध पदांची भरती
UPSC EPFO Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे इंफोर्समेंट ऑफिसर () आणि अकाऊंट ऑफिसर (Account Officer) या पदांसाठी डीएएफ(Detailed Application Form)मध्ये अर्जांसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. रिक्त पदांनुसार इपीएफओमध्ये एकूण ४२१ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. UPSC ने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, इन्फोर्समेंट ऑफिसर आणि अकाऊंट ऑफिसर यांच्या एकूण ४२१ जागांवर ही भरती केली जाणार आहे. या पदांसाठी (UPSC EPFO Registration 2021) अर्ज प्रक्रिया २ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. तसेच २२ नोव्हेंबर ही फी जमा करण्याची शेवटची तारीख आहे. आयोगातर्फे अद्याप परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. याप्रमाणे अर्ज करा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या What's New पर्यायावर जा. DAF: 'इन्फोर्समेंट ऑफिसर - अकाऊंट ऑफिसर, EPFO च्या ४२१ जागा' या लिंकवर क्लिक करा. मागितलेली माहिती भरुन नोंदणी पूर्ण करा. नोंदणी केल्यानंतर अर्ज भरा. भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट घ्या. रिक्त जागां तपशील केंद्रीय लोकसेवा आयोगाने(UPSC) रोजगार भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये (EPFO) इंफोर्समेंट ऑफिसर आणि अकाऊंट ऑफिसर पदाच्या ४२१ जागांसाठी भरती नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये () सर्वसाधारण श्रेणीसाठी १६८ जागा, ओबीसीसाठी ११६ जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच EWS प्रवर्गासाठी ४२ जागा, एससीआणि एसटी श्रेणीसाठी ३३ जागा आहेत. निवड प्रक्रिया अर्जदारांना लेखी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी बोलावले जाते. निवडलेल्या उमेदवारांना रोजगार भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि कामगार व रोजगार मंत्रालयामध्ये इन्फोर्समेंट ऑफिसर किंवा अकाऊंट ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाते. भरती चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांसाठी ७५: २५ असे वेटेज असेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31ghCAX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments