MBA CET Result 2021: 'त्या' ३८ जणांचा निकाल जाहीर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीए प्रवेशासाठी घेण्यता आलेल्या प्रवेश परीक्षेतील ३८ विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतील त्रुटींबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत या विद्यार्थ्यांनी याचिका मागे घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. सीईटी सेलमार्फत राज्यभरातील मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातील जवळपास एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी असल्याचे सांगत ३८ विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचदरम्यान या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याने याबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवून इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा, असे अंतरिम आदेश दिले होते. त्यानंतर सीईटी सेलमार्फत या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. परंतु, या ३८ विद्यार्थ्यांचा निकाल मात्र बाकी होता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3I0e4E0
via IFTTT

Post a Comment

0 Comments