MPSC Bharti 2021: वैद्यकीय शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी पदांची भरती

संजय मोरे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्यं विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेतील ८७ पदांसाठी भरती होणार आहे. औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब संवर्गात पदं रिक्त आहेत. ० पदाचं नाव- औषध निरीक्षक, अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-ब ० एकूण पदं- ८७ पदं (अजा-११, अज-१२, विजा-अ-२, भज-ब-२, भज-क-३, भज-ड-१, विमाप्र-१, इडब्ल्यूएस-१२, इमाव-१०, खुला-३३). महिलांसाठी २५ आणि खेळाडूंसाठी ६ पदं राखीव आहेत. दिव्यांग उमेदवारांसाठी तीन पदं राखीव आहेत. त्यातील एक पद अल्पदृष्टी, एक पद कर्णबधिरता, एक पद अस्थिव्यंगता/मेंदूचा पक्षाघात यासाठी आहे. ० वयोमर्यादा- १ मार्च, २०२१ रोजी १८ ते ३५ वर्षं. मागासवर्गीय/इडब्ल्यूएस/अनाथ/खेळाडू (खुला)- ४० वर्षं; खेळाडू (मागासवर्गीय/इडब्ल्यूएस/अनाथ) - ४३ वर्षं; दिव्यांग ४५ वर्षं. महाराष्ट्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना वयोमर्यादा लागू नाही. ० पात्रता- ८ डिसेंबर २०२१पर्यंत फार्मसी/फार्मास्युटिकल केमिस्ट्री/फार्माकोलॉजी (क्लिनिकल फार्माकॉलॉजी स्पेशलायझेशनसह)/मायक्रोबायोलॉजी विषयातील पदवी उत्तीर्ण. ० अनुभव- ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग किंवा टेस्टिंग या कामाचा किंवा ड्रग्ज अॅक्ट तरतूदींची अमलबजावणी कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव. संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांना किंवा ड्रग्ज सिन्थेसिस आणि टेस्टिंग या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ० निवड पद्धती- निवड केलेल्या उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात येईल (शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे किंवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल). चाळणी परीक्षा घेण्याचं निश्चित झाल्यास चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचं माध्यम व इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. ० परीक्षेचं स्वरुप- लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे एकूण १०० प्रश्न, प्रत्येकी २ गुण, एकूण २०० गुण, कालावधी एक तास. माध्यम इंग्रजी असेल. फिजिओलॉजी, पॅथोफिजिऑलॉजी, फार्माकोलॉजी आणि टॉक्झिकॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग्ज/फार्मास्युटिकल्स, जनरल नॉलेज रिलेटेड फार्मास्युटिकल्स/ मेडिसीन फिल्ड्, इंटेलिजन्स टेस्ट. मुलाखतीला ५० गुण आहेत. ० ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://ift.tt/3oZLYzp आणि https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ० ऑनलाइन अर्ज https://ift.tt/3oZLYzp या संकेतस्थळावर ८ डिसेंबर, २०२१पर्यंत करावेत. अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रं पीडीएफ फॉरमॅटमध्ये (५० केबी-५०० केबी) स्कॅन करून अपलोड करणं अनिवार्य आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IejiMD
via IFTTT

Post a Comment

0 Comments