टीव्ही शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार स्टार्ट अपचे धडे

Education: शालेय विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गुणांना चालना मिळावी यासाठी दिल्ली सरकार नेहमी प्रयत्नशील राहिले आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध संकल्पना आणल्या जातात. दरम्यान दिल्ली सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी टीव्हीवर 'बिझनेस ब्लास्टर्स' कार्यक्रम सुरू केला आहे.सरकारी शाळांतील इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना स्टार्ट-अप कसा करायचा? हे सांगणारा हा पहिला कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना गुंतवणूकदारांसमोर आपल्या स्टार्ट-अप कल्पना सादर करण्याची आणि प्राप्त करण्याची संधी देण्यात येईल. या शोमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कल्पनांना वाव मिळणार आहे. यामध्ये ३ लाख विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कल्पनांमधून ५१ हजार कल्पनांची निवड करण्यात आली आहे."टीव्ही शो विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कल्पनांसाठी एक प्लॅटफॉर्म देत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि समस्या सोडवण्याची मानसिकता विकसित करत आहे. ज्याचा भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले. बिझनेस ब्लास्टर्स हा जगातील सर्वात मोठा स्टार्ट-अप कार्यक्रम आहे. ५१ हजार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ३ लाख कल्पना आणि बीज भांडवल म्हणून ६० कोटी रुपये असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. हा कार्यक्रम आम्ही दिल्लीत आणि शेवटी भारतात आणू इच्छित असलेल्या शैक्षणिक क्रांतीचा एक अविभाज्य भाग असल्याचेही सिसोदीया म्हणाले. या कार्यक्रमाद्वारे मुलांना काही सर्जनशील कल्पना मांडण्याची संधी मिळते. इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम देशाच्या प्रगतीचा आधार ठरेल. याद्वारे मुले नोकऱ्यांच्या मागे धावणार नाहीत तर या मुलांना समोरुन नोकऱ्या मिळतील असेही ते म्हणाले. टीव्ही शो सुरू 'बिझनेस ब्लास्टर्स'च्या पहिल्या एपिसोडमध्ये तीन टीम एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील. कानपूरमधील प्रवासी कुटुंबातून आलेल्या यशच्या नेतृत्वाखालील पहिल्या टीमने उच्च दर्जाचे, कमी किमतीचे आणि उच्च कार्यक्षमता असलेले ब्लूटूथ स्पीकर्स विकणाऱ्या स्पीकरची त्यांची कल्पना मांडली. आम्ही आमच्या स्पीकरची किंमत ६ महिन्यांच्या वॉरंटीसह २९९ रुपये ठेवल्याचे यशने टीव्ही शोवर सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FVWK0T
via IFTTT

Post a Comment

0 Comments