एसबीआयमध्ये विविध पदांची भरती, PET प्रवेशपत्र 'असे' करा डाऊनलोड

SBI PET 2021: स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फे पूर्व परीक्षा प्रशिक्षण () जाहीर करण्यात आले आहे. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट sbi.co.in वरून डाउनलोड करता येणार आहे. पीओ पीईटी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी क्रेडेन्शियल्स म्हणजे नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागणार आहे. या स्टेप्स फॉलो करा सर्वप्रथम भारतीय स्टेट बॅंकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in.वर जा होमपेजवर असलेल्या 'Pre Examination Training Materials' सेक्शनवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी नोंदणी, जन्मतारीख भरा. प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर ते काळजीपूर्वक तपासावे. त्यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास SBI शी संपर्क साधून ती दुरुस्त करून घेऊ शकता. एससी/एसटी/ धार्मिक अल्पसंख्याक (SC/ST/Religious Minority Communities)उमेदवारांसाठी प्री ट्रेनिंग (Pre Examination Training)भारत सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असणार आहे. एसबीआयतर्फे परीक्षेच्या तारखेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही. मात्र, ही परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये घेतली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परीक्षेच्या तारखेपूर्वी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. या परीक्षेशी संबंधित माहितीसाठी किंवा प्रवेशपत्रासाठी उमेदवाराला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया पूर्व परीक्षा प्रशिक्षण, एसबीआय पीईटी साठी नोंदणी केलेले उमेदवार परीक्षेच्या तारखांची वाट पाहत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mSSRDm
via IFTTT

Post a Comment

0 Comments