डिसेंबर २०२१ मध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची डॉक्टरांची याचिका SC ने फेटाळली

DNB-DBNB Exam: डिसेंबर २०२१ मध्ये होणारी डीएनबी (DNB)/डीआरएनबी(DRNB) अंतिम थेअरी परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ४ डॉक्टरांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनवाणी झाली. २३ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, ही परीक्षा १६ डिसेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत होणार आहे. न्या.डी.वाय चंद्रचूड, न्या एएस बोपन्ना आणि न्या. विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय परीक्षेचे आयोजन करणाऱ्या विशेषज्ञ समितीने घेणे गरजेचे आहे. न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी परीस्थिती निर्माण झाली नसल्याचे न्यायालयाने म्हटले. याचिकाकर्त्यांनी एमबीबीएस (MBBS) आणि नीट पीजी २०२१ (NEET PG 2021) मध्ये निवडलेले डिप्लोमाच्या उमेदवारांना त्यांच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश होईपर्यंत परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या डॉक्टरांनी करोनाच्या संपूर्ण कालावधीत काम केले आहे. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तसेच थोड्या विश्रांतीसाठी मागणी करत असल्याचे याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी सांगितले. 'हे ते डॉक्टर आहेत ज्यांनी करोनाच्या माध्यमातून सेवा दिली आहे. आम्ही प्रॅक्टिकल पुढे ढकलण्यास सांगत नाही. पण प्रॅक्टिकलपर्यंत पोहोचण्यासाठी, थेअरीच्या माध्यमातून जावे लागेल. आम्हाला थोड्या विश्रांतीची गरज असल्याचे न्या. हेगडे म्हणाले. 'आम्ही परीक्षा कशी पुढे ढकलू शकतो? इतर हजारो विद्यार्थी असतील ज्यांनी तयारी केली असेल.' असे न्या. चंद्रचूड म्हणाले. खंडपीठाने पुढील आदेशासह याचिका फेटाळली 'डॉक्टर असलेल्या चार याचिकाकर्त्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये होणार्‍या DNB/DRNB अंतिम थेअरी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी नीट पीजी २०२१ मध्ये एमबीबीएस आणि डिप्लोमाची निवड केली आहे. उमेदवारांना त्यांच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये नियुक्ती होईपर्यंत परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलावी असे याचिकेत म्हटले आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केवळ परीक्षा आयोजित करणाऱ्या तज्ञ संस्था घेऊ शकतात. या न्यायालयाला घटनेचे कलम आहे. कलम ३२ अन्वये या याचिकेचा विचार करून नियमांचे उल्लंघन करण्याचे कोणते विशेष कारण नाही.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3G1Ns3s
via IFTTT

Post a Comment

0 Comments