Also visit www.atgnews.com
Scholarship Result: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता पाचवीचे १६.९९ टक्के आणि पूर्व माध्यमिक म्हणजेच इयत्ता आठवीचे ११.३९ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. एकूण १४.८४ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, ते आपला वैयक्तिक निकाल www.mscepune.in किंवा www.mscepuppss.in या संकेतस्थळांवर पाहू शकतील. मुंबई वगळता राज्यातील अन्य केंद्रावर या परीक्षेचे १२ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजन करण्यात आले होते. दृष्टीक्षेपात निकाल - इयत्ता पाचवी - परीक्षेला उपस्थित विद्यार्थी - ३,३७,३७० पात्र विद्यार्थी - ५७३३२ पात्रतेची टक्केवारी - १६.९९ इयत्ता आठवी - परीक्षेला उपस्थित विद्यार्थी - २१०३३८ पात्र विद्यार्थी - २३९६२ पात्रतेची टक्केवारी - ११.३९ विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनमध्ये २४ नोव्हेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरता ५० रुपये याप्रमाणे शुल्क आकारले जाईल. अंतिम निकाल कधी? विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी, ग्रामीण इत्यादी दुरुस्तीसाठी ५ डिसेंबर पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज पाठवल्यास तो स्वीकारला जाणार नाही. या मुदतीत ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगइनमध्ये ३० दिवसांपर्यंत कळवण्यात येईल. हे सर्व अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FNSwIR
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments