एमफिल आणि पीएचडी विद्यार्थ्यांना यूजीसीकडून मोठा दिलासा

MPhil PhD student: (MPhil) आणि (PhD) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एमफिल आणि पीएचडी उमेदवारांना विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मोठा दिलासा दिला आहे. एमफिल आणि पीएचडी प्रबंध सादर करण्यासंदर्भात आहे. यूजीसीने एमफिल आणि पीएचडी प्रबंध (MPhil PhD Thesis) सादर करण्याला मुदतवाढ दिली आहे. या संदर्भात यूजीसीने आपली अधिकृत वेबसाइट .ac.in वर नोटीसही जाहीर केली आहे. यूजीसीने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, एमफिल पीएचडी थीसिस सादर करण्यासाठी ६ महिन्यांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. याआधी प्रबंध सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ होती. आता ती ३० जून २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यूजीसीने उमेदवारांना ६ महिन्यांचा अतिरिक्त वेळ देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १६ मार्च २०२१ रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये ६ महिन्यांची मुदत वाढवण्यात आली होती. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, रिसर्च स्कॉलर्सचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे यूजीसीने म्हटले आहे. एमफिल किंवा पीएचडी थीसिस सबमिशन प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना ३० जून २०२२ पर्यंत अवधी असेल असेही यूजीसीने म्हटले आहे. प्रबंध सादर करण्यासाठी दिलेले अतिरिक्त ६ महिन्यांचा वेळ प्रबंध प्रकाशित करण्यासाठी आणि दोन कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशनसाठी लागू असेल. म्हणजेच, स्कॉलर्सना ३० जून २०२२ पर्यंत त्यांचा प्रबंध प्रकाशित करण्यासाठी आणि दोन कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशन देण्यासाठी वेळ असेल. ज्यांना याआधी कोणतीही फेलोशिप मिळत असेल त्यांना फक्त ५ वर्षांसाठी फेलोशिपची रक्कम दिली जाईल. थीसिस सबमिशनच्या तारखेला मुदतवाढ मिळाली तरी फेलोशिपच्या रक्कमेत वाढ होणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xIRtaf
via IFTTT

Post a Comment

0 Comments