Also visit www.atgnews.com
यंदा 'या' विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळणार
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया ''अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीतील अनुसूचित जाती-जमाती, दारिद्रयरेषेखालील विद्यार्थी आणि सर्व मुलींना मोफत गणेवश दिला जातो. दरवर्षी या विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी निधी दिला जातो. यंदा या निधीला कात्री लावून केवळ एकच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एका गणवेशासाठी ३०० रुपयांचा निधी वितरित केला जात असल्याने संताप वाढू लागला आहे. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १०३९ शाळा आहेत. यंदाच्या शैक्षणिक सत्रात पहिली ते आठवीपर्यंत ७४ हजार ४९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात ३७ हजार ५१९ मुले तर ३६ हजार ९७७ मुलींचा समवेश आहे. समग्र शिक्षा (प्राथमिक)अंतर्गत केंद्र शासनाकडून ६० टक्के तर राज्य शासनाने आपल्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम मंजूर करून समग्र शिक्षा खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. या अनुषंगाने गोंदिया जिल्हा परिषदेकडे सुमारे २ कोटी २६ लाख रुपयांचा निधी वळता करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेश देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी या उद्देशाने शासनाच्या शिक्षण विभागातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय हा गणवेश देण्यात येतो. दरवर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचे वाटप केले जाते. आज, १ डिसेंबरपासून काही शाळा उघडणार आहेत. यापूर्वी पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा उघडण्यात आल्या. शाळा सुरू झाल्यानंतर गणवेशाचे वाटप होणे आवश्यक होते. सरकारकडून गणवेश वाटपाचे नियोजनच उशीरा करण्यात आल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या विषयावर मुख्याधिकारी यांच्याशी बैठक झाली आहे. त्यांच्या निर्देशानुसार लवकरच शाळांना सदर निधी पाठविण्यात येणार असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम यांनी सांगितले. ३०० रुपयांत कुठे मिळणार गणवेश? गणवेश वाटपात गैरव्यवहार होण्याचा धोका असल्याने शासनाने शालेय व्यवस्थापन समितीला खरेदीचे अधिकार दिले आहेत. यात ३०० रुपयांत गणवेश कुठे आणि कसा मिळणार, हा प्रश्न समितीपुढे उभा ठाकला आहे. तर कमी किमतीत तयार झालेला या गणवेशाचा टिकाऊपणावरही संशय व्यक्त होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d8Badk
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments