Also visit www.atgnews.com
पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना हवी ऑनलाइन परीक्षा
म. टा. प्रतिनिधी, पुणे महाविद्यालयांची बंद असलेली वसतिगृहे, ओमायक्रॉनचे संकट अशा अनेक गोष्टींमुळे राज्यातील विद्यार्थी यंदाच्या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी करीत आहेत; मात्र महाविद्यालयांनी ऑफलाइन परीक्षांची तयारी सुरू केल्याने विद्यार्थी आणि महाविद्यालयांचे प्रशासन असा वाद होण्याची शक्यता आहे. वसतिगृहे सुरू झाल्याशिवाय आणि ओमायक्रॉनचा धोका कमी झाल्याशिवाय ऑफलाइन परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. पुण्यात ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू झाली असली, तरी वसतिगृहे सुरू करण्यात आलेली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त खर्च करून शहरातील खासगी वसतिगृहांमध्ये ज्यादा पैसे देऊन राहावे लागत आहे. त्यातच आता ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या प्रकाराने डोके वर काढल्याने यंदाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच व्हाव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत. राज्य सरकारने ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत महाविद्यालयाला सूचना केल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा देणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षांचा मार्गही उपलब्ध करून द्यावा, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना काही महाविद्यालये केवळ ऑफलाइन परीक्षा घेत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ऑनलाइन परीक्षा घेणे, ही गोष्ट मान्य आहे; पण सध्याची परिस्थिती पाहता परगावच्या विद्यार्थ्यांना शहरात राहण्याची सोय नाही. ओमायक्रॉनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुन्हा एकदा धसका घेतला आहे. असे असताना अनेक महाविद्यालये ऑफलाइन परीक्षेची वेळापत्रके जाहीर करीत आहेत. या परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. किती विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, हे कोण पडताळून पाहणार? - ऋषी परदेशी, समन्वयक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस निदान हे सत्र ऑनलाइन परीक्षा घ्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण सत्र ऑनलाइन झाले. ऑनलाइन अध्यापन प्रक्रियेत अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, तरी महाविद्यालये ऑफलाइन परीक्षा जाहीर करीत आहेत. ही बाब अन्यायकारक आहे. ऑफलाइन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी कसे यायचे, आलेच तर कुठे राहायचे, याचे उत्तर महाविद्यालयांनी द्यावे. आम्ही ऑफलाइन परीक्षांच्या विरोधात नाही; पण निदान हे सत्र ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. - कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँड पुढील आठवड्यात निर्णय? सावित्रीबाई फुले ाने परीक्षांबाबतीत अधिष्ठातांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. ही समिती परिस्थितीचा अभ्यास करून परीक्षा ऑनलाइन असाव्यात की ऑफलाइन व्हाव्यात, याबद्दल निर्णय घेणार आहे. समितीच्या अहवालानंतर निर्णय परीक्षा घेण्यासंदर्भात बुधवारी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षांच्या संभाव्य तारखांवर चर्चा झाली. या परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात, याबाबत एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीच्या अभ्यास अहवालानंतर परीक्षा ऑनलाइन घ्यायच्या की ऑफलाइन घ्यायच्या यावर निर्णय घेतला जाईल. प्रा, डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू,
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oYiV0K
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments