Also visit www.atgnews.com
आयआयटी मुंबईला माजी विद्यार्थ्यांकडून १७ कोटींची भेट!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई आयआयटी मुंबईतून १९९६मध्ये पदवीधर झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी पार पडलेल्या माजी विद्यार्थी कार्यक्रमात संस्थेला तब्बल १७ कोटींची आर्थिक मदत केली. यातून विविध शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. आयआयटी मुंबईने माजी विद्यार्थी दिवस हायब्रिड स्वरूपात साजरा केला. यावेळी रौप्य महोत्सवी बॅचने संस्थेला विविध प्रकल्पांच्या स्वरूपात १७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या विद्यार्थ्यांनी 'गो आयआयटी बॉम्बे' या नावाने निधी संकलन मोहीम हाती घेतली होती. यातून उभ्या राहिलेल्या निधीतून संस्थेतील प्रयोगशाळा अद्ययावत करणे, तरुण प्राध्यापकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यावेळी आयआयटीचे माजी विद्यार्थी प्रमोद चौधरी यांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून स्थापन झालेल्या 'प्रमोद चौधरी अॅलुमनी कंटिन्युइंग एज्युकेशन सेंटर'चे अनावरण करण्यात आले. संस्थेत जागतिक स्तरावरचे अद्ययावत वसतिगृह उभारण्यासाठी या बॅचने 'हॉस्टेल ८ कॉम्प्लेक्स-प्रोजेक्ट एव्हरग्रीन' हाती घेतला आहे. यानुसार ५० वर्षे जुन्या वसतिगृहाचे अत्याधुनिकीकरण करण्यासह निवासव्यवस्था वाढविण्यात येणार असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3JkJOEh
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments