Also visit www.atgnews.com
आरोग्य विभाग भरती परीक्षा: पेपर फुटीप्रकरणी एकाला अटक
म. टा. प्रतिनिधी, पुणे आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी बुधवारी एकाला औरंगाबाद येथून अटक केली आहे. विजय प्रल्हाद मुऱ्हाडेला (वय २९, ता. अंबड, जालना) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोग्य विभागातील 'गट ड' या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली होती. 'महाराष्ट्र टाइम्स'ने या बाबतची वृत्त प्रसिद्ध करून या विषयावर प्रकाशझोत टाकला होता. या प्रकारामुळे राज्य सरकारची आणि परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची फसवणूक झाली होती. त्यामुळे आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना फुटलेल्या पेपरच्या स्क्रीन शॉट्समध्ये विजय मुऱ्हाडे याचे नाव आढळून आले होते. तांत्रिक विश्लेषणातून त्याचा माग काढला. त्यानंतर त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीला हे पेपर कोणी पुरिवले, त्याने ते कोणाकोणाला पाठवले, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. हा सर्व कट कसा शिजला याची माहिती घेतली जात आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीत मुऱ्हाडेचे नाव समोर आले होते. त्याला अटक केल्यानंतर तो आता दुसऱ्यांची नावे सांगत आहे. या गुन्ह्यातील आरोपींची साखळी शोधण्यासंबंधी तपास सुरू आहे. - डी. एस. हाके, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31mpIYM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments