शाळा सुरू राहणार की बंद होणार? काय म्हणाले आरोग्यमंत्री

‘करोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी तूर्तास सुरूच राहिल्या पाहिजेत, हा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळेत लस न देता मुलांना लसीकरण केंद्रांवर नेऊन लस द्यावी, असा विचार पुढे आला आहे. त्यासाठी केंद्रांवर मुलांना बसने नेले जावे, अशी चर्चा झाली. त्याला मुख्यमंत्र्यांनी यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे,’ असेही टोपे म्हणाले. ‘राज्यातील ९० टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर ५७ टक्के लोकांचे दोन्ही डोस झाले आहेत. ज्या जिल्ह्यात कमी लसीकरण झाले आहे, त्या जिल्ह्यात लसीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत या संदर्भात प्रशासनाची बैठक होईल. लसीकरणात मागे असलेले जिल्हे राज्य सरासरीवर आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील,’ अशी माहिती टोपे यांनी दिली. राज्यात करोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या आणि ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या एक-दोन दिवसांत कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी गुरुवारी दिली. लग्न; तसेच अन्य कार्यक्रमांसाठी हॉलमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. त्यावेळी शाळांविषयीदेखील त्यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले, तेव्हा त्यांनी वरील संकेत दिले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32KNBtU
via IFTTT

Post a Comment

0 Comments