Also visit www.atgnews.com
Government Job: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती
BEL Recruitent: (, BEL) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनीअर ( ) पदांची भरती करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८ पदे भरली जाणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमधील बीईएल, बीई / बी.टेक असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा उमेदवारांची वयोमर्यादा २८ वर्षांपेक्षा जास्त नसावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. अर्ज शुल्क भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता पदांसाठी (Trainee Engineer posts) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर पीडब्ल्यूडी आणि एससी कॅटगरीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची वर्चुअल मुलाखत घेतली जाईल. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अर्ज प्रक्रिया यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bel-india.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. या पदांसाठी उमेदवारांना १५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. BEL प्रशिक्षणार्थी इंजिनीअरिंग पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34emp7B
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments