CBSE चा शालेय अभ्यासक्रम बदलणार, NCERT कडून पुस्तकांचा आढावा

Change: नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने शालेय पुस्तके आणि अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन सुरू केले आहे. चे कार्यकारी संचालक श्रीधर श्रीवास्तव यांनी संस्थेच्या सर्व विभागांच्या प्रमुखांना पत्र लिहून अंतर्गत आणि बाह्य तज्ञांच्या मदतीने शालेय अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यास तसेच आवश्यक बदल सुचविण्यास सांगितले आहे. त्यांनी यासंदर्भात २८ डिसेंबर २०२१ पर्यंत आढावा अहवाल मागितला आहे. तज्ञांनी केलेल्या शिफारशी आणि प्रस्तावांच्या आधारे NCERT तर्फे शालेय अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे. यामुळे सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम (CBSE Board Syllabus 2022) देखील बदलणार आहे. करोनामुळे शाळा दीर्घकाळ बंद राहिल्याने आणि अभ्यास विस्कळीत झाल्याने सलग दोन शैक्षणिक सत्रे उशीर झाली आहेत. यामुळे मुलांवर अभ्यासक्रमाचा ताण वाढला आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून ही तफावत लवकरात लवकर भरून काढण्यासाठी आणि मुलांवरील अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एनसीईआरटीचे म्हणणे आहे. NCERT संचालक (प्रभारी) यांनी अभ्यासक्रमातील बदलांसाठी संसदीय स्थायी समिती आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, 'आम्ही राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (National Curriculum Framework)विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यामुळे नवीन पाठ्यपुस्तक तयार करण्यास थोडा वेळ लागेल. पण करोना महामारीमुळे वाढलेल्या ओझ्यातून मुलांना बाहेर येण्याची संधी देण्यासाठी एनसीईआरटीला हे पाऊल उचलावे लागणार आहे.' 'पुढच्या वर्षासाठी आम्ही प्राथमिक स्तरावरील (इयत्ता पहिली ते पाचवी) पुस्तकांमध्येही काही बदल केले आहेत. आता ते सहावी ते बारावीपर्यंत सुरू ठेवावे लागणार आहे. या वर्गांमध्ये प्रत्येक विषयासाठी सरावाची गरज असल्याचेही ते म्हणाले. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी संसदीय स्थायी समितीने (शिक्षण) शालेय अभ्यासक्रम कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले होते. बाकीच्यांनीही असाच दृष्टिकोन ठेवावा, जेणेकरून आशयाचा ओव्हरलोड कमी करता येईल, असे पॅनेलने म्हटले होते. यासाठी एनसीईआरटीला इतर राज्यांच्या परिषदांच्या सहकार्याने काम करण्याचा सल्ला देण्यात आला. २०१४ पासून आतापर्यंत NCERT ने असे दोन रिव्ह्यू केले आहेत. २०१७ मध्ये NCERT च्या १८२ पुस्तकांमध्ये एकूण १,३३४ बदल करण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33FgxUG
via IFTTT

Post a Comment

0 Comments