Also visit www.atgnews.com
बालकांच्या शिक्षण निर्देशांकात महाराष्ट्र तिसरा
टाइम्स वृत्त, नवी दिल्ली देशभरातील दहा वर्षांखालील बालकांमधील साक्षरतेचा निर्देशांक असलेल्या 'पायाभूत आणि संख्यता निर्देशांका'नुसार मोठ्या व लहान राज्यांच्या वर्गवारीमध्ये अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि केरळ ही राज्ये अनुक्रमे ५९ आणि ६८ गुणांसह अव्वल ठरली आहेत. 'इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पीटिटिव्हनेस'ने हा अहवाल तयार केला असून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी हा अहवाल जाहीर केला. मोठ्या राज्यांमध्ये तमिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. तर उत्तर प्रदेश (३८ गुण) आणि बिहार (३७ गुण) हे तळाशी आहेत. मोठी राज्ये, लहान राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येकडील राज्ये अशा वर्गवारीमध्ये हा निर्देशांक जारी करण्यात आला आहे. लहान राज्यांचा विचार करता ६८ गुणांसह केरळ अव्वल ठरले, तर झारखंड ४५ गुणांसह तळाशी राहिले. केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५२.६९ गुणांसह लक्षद्वीप, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये ५१.६४ गुणांसह मिझोरम अव्वल ठरले. या दोन वर्गवारींमध्ये अनुक्रमे लडाख आणि अरुणाचल प्रदेश हे तळाशी राहिले. शिक्षणासाठीच्या पायाभूत सुविधा, शिक्षणाची उपलब्धता, आरोग्य, शिक्षणाची फलनिष्पत्ती आणि प्रशासन या पाच प्रमुख मुद्द्यांच्या आधारे ४१ घटकांचा विचार करण्यात आला होता. प्रशासनाच्या मुद्द्यावर राज्यांची कामगिरी खूपच वाईट ठरल्याचे या अहवालात समोर आले आहे. या मुद्द्यावर देशभरातील ५० टक्के राज्यांची कामगिरी २८.०५ गुणांच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा खाली आहे. तर शिक्षणासाठीच्या पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावर दिल्ली, चंडीगढ, दमण आणि दीव यांची कामगिरी चांगली असून त्यांना अनुक्रमे ९२.९८, ९२.९७ आणि ९१.२४ गुण मिळाले आहेत. ० मोठ्या राज्यांची क्रमवारी राज्ये -- गुण --क्रमांक पश्चिम बंगाल -- ५९ -- १ तमिळनाडू --५५ -- २ महाराष्ट्र -- ५३ -- ३ कर्नाटक -- ५० -- ४ गुजरात --५० -- ५ राजस्थान -- ४७ -- ६ मध्य प्रदेश -- ३९ -- ७ उत्तर प्रदेश -- ३८ -- ८ बिहार -- ३७ -- ९ ० लहान राज्यांची क्रमवारी राज्ये -- गुण -- क्रमांक केरळ -- ६८ -- १ हिमाचल प्रदेश -- ५७ -- २ पंजाब -- ५६ -- ३ उत्तराखंड -- ५६ -- ४ हरयाणा -- ५३ --५
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33GEMSo
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments