ESIC Recruitment 2022: ईएसआयसीत क्लर्क भरती; महाराष्ट्रात ५०० हून अधिक जागा

2022: कर्मचारी राज्य विमा निगम (Employees' State Insurance Corporation, ESIC)ने विविध पदांवरील भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ () या पदांच्या एकूण ३,८४७ जागांवर ही भरती होणार आहे. यापैकी महाराष्ट्रात ५९४ जागा आहेत. अर्ज प्रक्रिया १५ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२२ आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत 'अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)' पदाच्या महाराष्ट्रातील एकूण रिक्त जागा ५९४ आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पदाचे नाव – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पद संख्या – ५९४ जागा शैक्षणिक पात्रता – दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्ण (पदानुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता) नोकरी ठिकाण – महाराष्ट्र वयोमर्यादा – MTS आणि – १८ ते २७ वर्षे UDC – १८ ते २५ वर्षे अर्ज शुल्क – SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक – रु. २५०/- इतर प्रवर्गासाठी – रु. ५००/- अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२२ अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sHNPNs
via IFTTT

Post a Comment

0 Comments