Maharashtra NEET Counseling 2021: मेडिकल प्रवेशांची नोंदणी सुरू

Maharashtra NEET Counseling 2021: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) द्वारे अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नसली तरी विविध राज्यांनी स्टेट कोट्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली आहे. इडब्लूएस कोट्याच्या उत्पन्न मर्यादेबाबतचा एका याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने ही प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. महाराष्ट्र राज्यातील मेडिकल आणि डेंटल कॉलेजांमधील विविध पदवी अभ्यासक्रमांच्या स्टेट कोटा सीट्सवर प्रवेशासाटी गुरुवार ३० डिसेंबर २०२१ पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या ८ जानेवारी रोजी या अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रवेश फेऱ्यांचे नियोजन केले जाणार आहे. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएसल बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीएससी नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. तसेच आवश्यक कागदपत्रेही अपलोड करावी लागणार आहे. यासाठी ५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली आहे. ८ जानेवारीला या सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कोट्यांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील ८५ टक्के जागा आणि खासगी मेडिकल कॉलेजांमधिली १०० टक्के जागांवरील प्रवेशांसाठी काऊन्सेलिंग प्रक्रिया आयोजित केली जात आहे. नीटमध्ये पात्र उमेदवारांनी पुढील पद्धतीने नोंदणी करायची आहे - स्टेप १ - सीईटी सेलची अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जा. स्टेप २ - होमपेज पर 'नीट-यूजी 2021' वर क्लिक करा. स्टेप ३ - स्क्रीन वर एक नवे पेज दिसेल. स्टेप ४ - रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा आणि अर्ज भरण्यासाठी निर्देश काळजीपूर्वक वाचा. स्टेप ५ - अर्जातील सर्व माहिती भरावी. स्टेप ६ - अर्ज शुल्क भरावे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. स्टेप ७- फॉर्म जमा करा आणि एक प्रिंटआऊट घ्या. महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२१ साठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे- नीट २०२१ चे अॅडमिट कार्ड नीट ऑनलाइन अर्जाची कॉपी नीट गुणतालिका राष्ट्रीयत्वाचा दाखला बारावीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र वयोमर्यादेसाठी दहावीचे प्रमाणपत्र आधार कार्ड डोमिसाइल सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट विशिष्ट प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3JtjIyX
via IFTTT

Post a Comment

0 Comments