Also visit www.atgnews.com
Fyjc Admission: सात फेऱ्या राबवूनही पुण्यात ४० हजार जागा रिक्त
म. टा. प्रतिनिधी, पुणे: अकरावी प्रवेशांच्या सात फेऱ्या राबवूनही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ४० हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. अकरावी प्रवेशाच्या सर्व फेऱ्या संपवण्याची घोषणा करण्यात आली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ३१७ कॉलेजमध्ये ३९ हजार २५१ जागा रिक्त राहणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण एक लाख १३ हजार ४४५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यापैकी ७४ हजार १९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामुळे दहावीचा निकाल शंभर टक्के लागूनही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याचे दिसून आले. अकरावी प्रवेशांसाठी केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एकूण सात फेऱ्या राबवण्यात आल्या. यामध्ये तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी आणि तीन प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील फेऱ्यांचा समावेश होता. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रवेश फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. परिणामी, दिवाळीनंतरही अकरावीसाठी प्रवेश सुरू होते. सर्व फेऱ्या संपल्यानंतर ३९ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्याने विद्यार्थी गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याचा विचार करता मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये राज्यात सर्वाधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. शिक्षण विभागाकडून प्रवेश का घटले, याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्यापही घटलेल्या प्रवेशांची कारणमीमांसा करण्यात आलेली नाही. कदाचित करोनामुळे शहराकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असल्याने शहरातील प्रवेशही घटले आहेत, असे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. राज्यात एक लाख ६३ हजार जागा रिक्त मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीच्या प्रवेशांसाठी राबवण्यात आलेल्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एक लाख ६३ हजार ४१७ जागा रिक्त आहेत, असे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. राखीव जागा (कोटा) वगळून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक रिक्त जागा मुंबईत असून, त्या पाठोपाठ पुण्याचा नंबर लागला आहे. राज्यातील राखीव जागांची परिस्थिती संस्थांतर्गत रिक्त जागा : आठ हजार ६८७ अल्पसंख्यांक : १४ हजार ८८७ मॅनेजमेंट : ८ हजार ७१५
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3du4Npu
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments