Also visit www.atgnews.com
Government Job: एमपीएससीतर्फे २९० पदांची भरती, प्रवेशपत्र 'असे' करा डाऊनलोड
Admit Card: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर प्रवेशपत्र पाहता येणार आहे. ही परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. करोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करून विविध परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन माध्यमातून पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. राज्य सेवा परीक्षा प्रवेश पत्र २०२१ डाउनलोड करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रेडेन्शियल्समध्ये नोंदणीकृत आयडी, पासवर्ड आणि मोबाइल नंबर भरणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जा. होमपेजच्या उजव्या कोपर्यात दिलेल्या 'लॉगिन' टॅबवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबर आणि पासवर्ड भरा. प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या. पदभरतीचा तपशील ही भरती परीक्षा उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र), सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट विकास अधिकारी, सहाय्यक संचालक इत्यादी पदांच्या भरतीसाठी घेण्यात येत आहे. या पदभरती अंतर्गत एकूण २९० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.ही लेखी परीक्षा १०० गुणांची असेल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसता येणार आहे. एमपीएससी राज्य सेवा प्रवेशपत्र २०२१ संदर्भातील अधिक अपडेट वेबसाइटवर देण्यात येईल. महत्वाचे निर्देश प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर दिलेली सर्व माहिती तपासा. चुकीची माहिती दिली असल्यास ती दुरुस्त केली जाऊ शकते. उमेदवारांना परीक्षेसाठी वेळेवर केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. गेट बंद केल्यानंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FjfGHe
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments