Also visit www.atgnews.com
NEET UG काऊन्सेलिंग चार टप्प्यात होणार
counseling: वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) NEET (UG) समुपदेशन २०२१ संदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (UG) 2021 च्या निकालांच्या आधारे अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर विशेष सूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार देशभरातील केंद्रीय वैद्यकीय संस्था राज्यांच्या वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये यूजी अभ्यासक्रमांमधील ऑल इंडिया कोट्यातील जागांसाठी घोषित उत्तीर्ण उमेदवारांचे काऊन्सेलिंग चार टप्प्यात केले जाणार आहे. अशाप्रकारे पीजी अभ्यासक्रमांसाठी देखील MCC द्वारे चार टप्प्यांत समुपदेशन प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. नीट यूजी २०२१ (NEET UG 2021) काऊन्सेलिंग हे यूजी अभ्यासक्रमातील १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील जागांसाठी आणि ५० टक्के पीजी जागांसाठी आरोग्य सेवा महासंचालनालय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) द्वारे केले जाणार आहे. MCC च्या सूचनेनुसार, चार टप्प्यातील काऊन्सेलिंग एआयक्यू राउंड १, एआयक्यू राउंड २, एआयक्यू मॉप-अप राऊंड आणि एआयक्यू स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडचे असेल. जे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोजित केले जाणार आहे. NEET UG काऊन्सेलिंग तारखांची अपडेट MCC द्वारे नीट यूजी २०२१ काऊन्सेलिंग संदर्भात नोटिसमध्ये टप्पे देण्यात आलेअसले तरी हे टप्पे सुरु होण्याच्या तारखा समितीने जाहीर केलेल्या नाहीत. उमेदवार नीट काऊन्सेलिंग २०२१ च्या वेळापत्रकासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याची सूचना करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EhCbe1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments