Also visit www.atgnews.com
TET examination: राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित
मुंबई: टीईटी निकाल फेरफार प्रकरणी अटकेत असलेले राज्य परीक्षा परिषदेचे यांना महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये निलंबित करण्यात आले आहे. यावर पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. २०१९-२० टीईटीमध्ये केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना १६ डिसेंबर रोजी रोजी अटक करण्यात आली आहे. सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून ४८ तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहेत. यामुळे नियमांचा वापर करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत सुपे यांचे मुख्यालय हे पुणे येथील परीक्षा परिषदेचे कार्यालयच असणार आहे. यामुळे शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच त्यांनी खासगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. सन २०१९-२०२० मधील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. दीड कोटी रुपयांची रोकड जप्त आरोग्य भरती, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त ( ) यांच्या घरी पोलिसांनी (Pune Police) दुसरा छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी दीड कोटी रुपयांची रोकड आणि दीड किलोचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. टीईटी परीक्षेत ८०० विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्यासाठी तुकाराम सुपे व शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर या दोघांना ४ कोटी २० लाख रुपये मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यातील १ कोटी ७० लाख रुपये सुपे यांना मिळाले होते. सुपे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली. त्यावेळी ८८ लाख ४९ हजार रुपयांची रोकड, पाच ग्रॅमचे सोन्याचे नाणे, पाच तोळे दागिने, साडेपाच लाख रुपयांच्या मुदत ठेवीची कागदपत्रे त्यांच्याकडं आढळली होती. मात्र, पोलिसांनी झडत घेण्याच्या आधीच सुपे यांची पत्नी आणि मेहुण्याने काही रक्कम दुसरीकडे ठेवली होती. पोलिसांनी दुसऱ्यांदा छापा टाकून घेतलेल्या झडतीत १ कोटी ५८ लाखांची रोकड आणि दीड किलोचे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yL0qjL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments