Also visit www.atgnews.com
NTPC मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील
NTPC Recruitment 2021: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने () विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत सहाय्यक कायदा अधिकारी () पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया क्लॅट परीक्षेद्वारे (CLAT Exam) केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण १० पदे भरली जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in वर अर्ज करता येणार आहे. कोणत्याही इतर वर्षाचा CLAT स्कोअर किंवा इतर कोणत्याही परीक्षेचा स्कोअर विचारात घेतला जाणार नाही. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ७ जानेवारी २०२२ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. NTPC ने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण रिक्त पदांपैकी ६ पदे खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी, १ पद इडब्ल्यूएससाठी, २ पदे ओबीसी वर्गासाठी आणि १ पद एससी वर्गासाठी राखीव असणार आहे. अर्ज शुल्क असिस्टंट लॉ ऑफिसर पदांसाठी सामान्य / ईडब्ल्यएस / ओबीसी वर्गातील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क परत केले जाणार नाही. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत 'पे स्लिप'द्वारे शुल्क ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून भरता येणार आहे. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर मिळू शकणार आहे. असिस्टंट लॉ ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया २४ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z3cZHt
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments