Also visit www.atgnews.com
रेल्वे ग्रुप डी परीक्षेला बसलेल्या लाखो उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट
Exam: रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप डी परीक्षेंसाठी मॉडिफिकेशन लिंक बंद करण्यात आली आहे. बोर्डातर्फे लवकरच अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर आरआरबी ग्रुप डी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. ग्रुप डी परीक्षा २३ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. देशभरातून या परीक्षेला बसलेल्या लाखो उमेदवारांना परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रमासंबंधीची आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे. इंग्रजी विषयाचा पेपर होणार नाही RRB ग्रुपडी ची निवड प्रक्रिया २ टप्प्यात असेल. पहिला टप्पा कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT)माध्यमातून असेल. ज्यामध्ये इंग्रजीचा पेपर नसेल. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. फिजिकल टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. असे असेल मार्किंग CBT मध्ये एकूण १०० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. याशिवाय परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग देखील असेल. प्रत्येक चुकीच्या ३ प्रश्नांसाठी 1 गुण वजा केला जाईल. उमेदवारांना परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ दिला जाईल. या अंतर्गत जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगमधून ३० प्रश्न, गणिताचे २५ प्रश्न, जनरल सायन्स २५ प्रश्न आणि जनरल अवेअरनेस व चालू घडामोडीतून २० प्रश्न विचारले जातील. या पदांची होणार भरती आरआरबीतर्फे ७ विभागात भरती केली जाणार आहे. या अंतर्गत मेकॅनिकल, इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल, स्टोअर्स, ट्रॅफिक, सिग्नल कम्युनिकेशन, मेडिकल डिव्हिजनमध्ये रिक्त पदे भरली जाणार आहेत. असिस्टंट वर्कशॉप, असिस्टंट लोको शेड (डिझेल), असिस्टंट कॅरेज आणि वॅगन, ट्रॅक मेंटेनर ग्रेड-4, असिस्टंट ब्रिज, असिस्टंट ऑपरेशन्स, असिस्टंट ट्रॅक मशीन, असिस्टंट वर्क्स, असिस्टंट लोको शेड, असिस्टंट डेपो, असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉम, हॉस्पिटल सहाय्यक, सहाय्यक पॉइंट्समनसारख्या पदांवर भरती केली जाणार आहे. प्रदेशानुसार प्रवेशपत्र परीक्षेसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वरून डाउनलोड करता येणार आहे. याशिवाय १५ हून अधिक रेल्वेच्या प्रादेशिक अधिकृत वेबसाइटवरून देखील प्रवेशपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. या वेबसाइटवरील होमपेजवर जाऊन ई-कॉल लेटर डाउनलोड करण्याच्या लिंकवर क्लिक केल्यास प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fv7Dae
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments