RRB NTPC तर्फे ३५ हजारहून अधिक पदांची भरती, 'या' स्टेप फॉलो करुन तपासा निकाल

RRB NTPC Result 2021: रेल्वे भरती बोर्डातर्फे (Railway Recruitment Board) सीबीटी १ निकाल १५ जानेवारी २०२२ पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात एनटीपीसी उमेदवारांच्या निकालांची प्रतीक्षा () नवीन वर्षात संपेल अशी अपेक्षा आहे. १५ जानेवारी २०२२ पर्यंत निकाल जाहीर केला जाईल (संभाव्य) असे रेल्वेने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. उमेदवारांचे निकाल रेल्वे भरती बोर्डाच्या प्रादेशिक वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. उमेदवारांना त्यांचा निकाल त्यांच्या प्रादेशिक वेबसाइटवर जाऊन पाहता येणार आहे. आरआरबीतर्फे नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (RRB NTPC) पदांवर ३५ हजारहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी ७ टप्प्यांमध्ये कॉम्प्युटर आधारित चाचणी घेण्यात आली. या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल स्टेप १: सर्वप्रथम तुमच्या प्रदेशिक RRB वेबसाइटवर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा. स्टेप ४: निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: आता निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा. प्रादेशिक वेबसाइट्सची यादी(RRB Websites list) गुवाहाटी - rrbguwahati.gov.in आरआरबी जम्मू - rrbjammu.nic.in कोलकाता - rrbkolkata.gov.in मालदा - rrbmalda.gov.in मुंबई - rrbmumbai.gov.in मुझफ्फरपूर - rrbmuzaffarpur.gov.in पाटणा - rrbpatna.gov.in रांची - rrbranchi.gov.in सिकंदराबाद - rrbsecunderabad.nic.in अहमदाबाद - rrbahmedabad.gov.in अजमेर - rrbajmer.gov.in अलाहाबाद - rrbald.gov.in रेल्वे भरती बोर्डाने (Railway recruitment board, RRB) NTPC CBT- २ साठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा १४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार आहे. आरआरबी एनटीपीसी सीबीटी १ (RRB NTPC CBT 1) परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार सीबीटी २ (CBT 2) परीक्षेत बसू शकणार आहेत. आरआरबी एनटीपीसी सीबीटीच्या परीक्षेत जनरल अवेअरनेस, मॅथेमॅटिक्स आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग या तीन विषयातून प्रश्न विचारले जातील परीक्षेत जनरल अवेअरनेसमधून ५० गुण, गणितातून ५० गुण आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगमधून ३५ गुणांचे प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत एकूण १२० गुणांचे प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना दीड तासांचा वेळ मिळणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pzGYm5
via IFTTT

Post a Comment

0 Comments