Also visit www.atgnews.com
'टीईटी' घोटाळ्याच्या चौकशीसाठी आयोग नेमण्याची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेत () झालेला अर्थिक घोटाळा आणि त्यानंतर झालेल्या नियुक्त्यांची चौकशी स्वतंत्र आयोगामार्फत करण्याची मागणी राज्यातील शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. 'टीईटी'च्या आयोजनात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी न्यायाधीशांमार्फत आयोग नेमला जावा अशीहा मागणी करणारे निवेदन शालेय शिक्षण विभागाकडे देण्यात आले आहे. 'टीईटी'च्या आयोजनात झालेल्या गैरव्यवहाराची दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परीक्षांमध्ये गैरव्यवहार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यातील शिक्षण, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांची भेट घेतली. शिक्षण अभ्यासक हेरंब कुलकर्णी, अॅड. असीम सरोदे, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत, सिसकॉम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर, वैशाली बाफना, राष्ट्रसेवा दलाचे विलास किरोते, संजय दाभाडे, सुरेश साबळे, प्रकाश टेके, विद्यानंद नायक आणि सतीश यादव यांचा शिष्टमंडळात समावेश होता. एकीकडे 'टीईटी' देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण केले जात असताना दुसरीकडे राज्यात भरती बंद असूनही हजारो शिक्षकांची नेमणूक केली गेली. या नेमणुका २०१२ पूर्वी झाल्याचे भासवण्यात आले. विनाअनुदानित शाळांमधून अनुदानित शाळांमध्ये नेमणुका देतानाही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. या सर्व प्रकरणांची व्याप्ती पाहता संपूर्ण घोटाळ्याची चौकशी न्यायाधीशांमार्फत आयोग स्थापन करून होणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. सरकारने सत्य समोर आणण्यासाठी २०१२ ते २१ या काळातील सर्व नेमणुका तपासण्याची गरज असून, त्याबाबतची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eMyW3X
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments