AIIMS मध्ये नोकरी मिळवण्याची संधी, जाणून घ्या तपशील

AIIMS 2022: मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) जोधपूरतर्फे प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार AIIMS ची अधिकृत वेबसाइट aiimsjodhpur.edu.in वर जाऊन अर्ज करू शकतात. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. AIIMS जोधपूर भरती २०२२ च्या नोटिफिकेशननुसार, या भरती अंतर्गत प्राध्यापक पदांची एकूण ८४ पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी लागणारी पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. भरती २०२२ नोटिफिकेशन लवकरच वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. एम्स रिक्त जागा २०२२ तपशील प्राध्यापक: ३१ पदे अतिरिक्त प्राध्यापक: १४ पदे सहयोगी प्राध्यापक: २४ पदे सहाय्यक प्राध्यापक: १५ पदे एकूण रिक्त पदांची संख्या - ८४ पदे कोण करू शकतो अर्ज? प्राध्यापक (Professor) आणि अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावी. तर असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे. पदनिहाय शैक्षणिक पात्रतेचे तपशील लवकरच नोटिफिकेशनमध्ये जाहीर करण्यात पगार या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७व्या वेतन आयोगानुसार पगार (वेतन स्केल) मिळेल. प्राध्यापक: १ लाख ६८ हजार ९०० ते २ लाख २० हजार ४०० अॅडिशनल प्रोफेसर: १ लाख ४८ हजार २००-२ लाख ११ हजार ४०० असोशिएट प्रोफेसर- १ लाख हजार ३८ हजार ३००-२ लाख ९ हजार २०० असिस्टंट प्रोफेसर: १ लाख १ हजार पाचशे-१ लाख ६७ हजार ४००


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pK6rdR
via IFTTT

Post a Comment

0 Comments