Also visit www.atgnews.com
रायगडमध्ये आरोग्य विभागात भरती, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
NHM : रायगडच्या आरोग्य विभागा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. रायगडच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ( )ही भरती केली जाणार आहे. यामध्ये अलिबाग-रायगडमधील प्रशासकीय विभागात वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) आणि स्टाफ नर्स (Staff nurse) पदाच्या एकूण ४४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मेडिकल ऑफिसर पदाच्या ९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. स्टाफ नर्स पदाच्या एकूण ९ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत. ही पदभरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. शासकीय पदांना मिळणारे अधिकार आणि सवलत या पदांसाठी लागू नसतील. नोटिफिकेशनमध्ये अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. त्यानुसार ए ४ साइज कागदावर अर्ज टाइप करुन किंवा कॉम्प्युटरवरील पेजवरुन अर्ज भरावा लागेल. उमेदवारांनी अर्जासोबत वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाचे सर्टिफिकेट, महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र, शासकीय/निमशासकीय अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. ही भरती करोना कालावधीपुरती मर्यादित असेल. करोना साथ कमी झाल्यास किंवा करोना उपचार कक्ष बंद झाल्यास किंवा लसीकरण बंद झाल्यास ही नेमणूक संपुष्टात येईल. यासाठी अर्ज प्रक्रिया ७ जानेवारीपासून सुरु झाली असून उमेदवारांना ३० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. उमेदवारांनी आपला अर्ज कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दूसरा मजला, ओपीडी बिल्डिंग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग, जि. रायगड या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zIRwne
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments