Also visit www.atgnews.com
सशस्त्र दलात मुलींच्या सहभागासाठी १०० नवीन शाळा सुरू करणार, राजनाथ सिंह यांची घोषणा
for Girls: सशस्त्र दलात (Armed Forces)मुलींच्या अधिक सहभागासाठी १०० नवीन सैनिक शाळा (Military school ) स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defencee Minister Rajnath Singh) यांनी केली. सैनिक शाळांवरील वेबिनारमध्ये (Military school Webinar) ते बोलत होते. १०० नवीन सैनिक शाळांच्या स्थापनेमुळे मुलींना सशस्त्र दलात (Girls in ) सामील होण्याची आणि राष्ट्रीय सुरक्षेत योगदान देण्याची संधी मिळेल असे ते वेबिनार दरम्यान म्हणाले. सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर सरकार भर देत आहे. सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाची सुविधा आणि महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी पदभार देण्यासह अनेक पावले या दिशेने उचलण्यात आली आहेत. सर्व सैनिक शाळांच्या रॅंकिंगचे तंत्र तयार करण्यासाठी संरक्षण विभाग आणि सैनिक स्कूल सोसायटीला सूचना करण्यात आली आहे. सैनिक हे एकात्मतेचे, शिस्तीचे आणि भक्तीचे प्रतीक असले तरी शाळा हे शिक्षणाचे केंद्र आहे. संरक्षण आणि शिक्षण सैनिक शाळा आगामी काळात राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. सैनिकी शाळांच्या परीक्षेसंदर्भात अपडेट ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (All India Sainik School Entrance Examination, AISSEE 2022 admit card) ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे जाहीर केली आहेत. एआयएसएसईई प्रवेशपत्र २०२२ ( AISSEE Admit Card 2022) डाउनलोड करण्याची लिंक अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर सक्रिय करण्यात आली. सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२२ साठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पोर्टलवर दिलेल्या लिंकवरून AISSEE २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. इयत्ता सहावी आणि नववीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करणारे सैनिक शाळा प्रवेश परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3F5Q27X
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments