Also visit www.atgnews.com
करोना प्रादुर्भावामुळे सीबीएसई परीक्षा स्थगित करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) टर्म २ च्या परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. या परीक्षांचे अद्याप जाहीर झाले नाही. विद्यार्थी टर्म १ च्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, वाढती करोना रुग्णसंख्या पाहता सीबीएसईच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षा घेण्याची मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावर विद्यार्थी आपले मत व्यक्त करत आहेत. करोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. देशभरात दररोज लाखो रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ऑफलाइन परीक्षा (CBSE Offline Exam) करणे योग्य नसून टर्म २ बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. एका सीबीएसई विद्यार्थ्याने लिहिले की, 'मला वाटते की सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू नये आणि बोर्डाच्या परीक्षा रद्द करावी. विद्यार्थ्यांनी आधीच वस्तुनिष्ठ परीक्षा दिली आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यापेक्षा दुसरे काही महत्त्वाचे मला वाटत नाही.' 'माझ्यासह शाळांमधील बहुतेक विद्यार्थ्यांचा आग्रह आहे की, तुम्ही यावर्षी होणारी दुसरी टर्म परीक्षा रद्द करा. रद्द करता येत नसेल तर ऑनलाइन परीक्षा घ्या.' असे दुसऱ्या युजरने सोशल मीडियावर म्हटले आहे. अशाप्रकारचे अनेक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये विद्यार्थी आपल्या मागण्या मांडत आहेत. मात्र बोर्डाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. टर्म २ नमुना पेपर जारी सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर टर्म २ बोर्ड परीक्षेसाठी नमुना पेपर्स प्रसिद्ध केले आहेत. यामुळे बोर्ड टर्म २ परीक्षा ()होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच तिसरी लाट नियंत्रणात आहे असे आरोग्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यासोबतच १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची लसीकरण मोहीमही वेगाने सुरू आहे. त्यामुळे सीबीएसई विद्यार्थी वेळापत्रकानुसार टर्म २ बोर्ड परीक्षेला बसू शकतात. टर्म १ चा निकाल आणि टर्म २ च्या बोर्ड परीक्षांसंबंधी अपडेटसाठी विद्यार्थ्यांना सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in नियमितपणे तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GD6M7P
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments