Also visit www.atgnews.com
शेतकऱ्याची कमाल! दहावी उत्तीर्ण, पण अनुभवामुळे सिलॅबस कमिटीत निवड
टाइम्स वृत्त, जयपूर इयत्ता दहावीमध्येच शालेय शिक्षण सोडणाऱ्या येथील एका शेतकऱ्याची राष्ट्रीय कृषी विद्यापीठांचा शेतीविषयक अभ्यासक्रम आखण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही किमया केली आहे ती या शेतकऱ्याच्या सेंद्रीय शेतीतील ज्ञानाने. हुकुमचंद पाटीदार असे या शेतकऱ्याचे नाव असून ते राजस्थानच्या झालावाड येथील मानपुरा गावाचे रहिवासी आहेत. पारंपरिक व सेंद्रीय शेतीद्वारे भरघोस पीक घेणाऱ्या पाटीदार यांचा लौकिक सातासमुद्रापारही पोहोचला आहे. या कर्तृत्वाची दखल घेत केंद्र सरकारतर्फे २०१९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता त्यांच्या या ज्ञानाचा देशभरातील शेतकऱ्यांना उपयोग व्हावा यासाठी राष्ट्रीय कृषी विद्यापीठांचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. पाटीदार यांनी सेंद्रीय शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी सेंद्रीय पद्धतीने पिकवलेली संत्री, डाळी, कांदा, कोथिंबीर, बडीशेप केवळ भारतात नावाजली गेलेली नाहीत, तर युरोपसह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, कोरिया आदी देशांमध्येही त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. 'शेतीमध्ये जमिनीचे कर्बचक्र महत्त्वाचे असते. हे कर्बचक्र सक्षम होण्यासाठी मी अनेक नावीन्यपूर्ण उपाय करत आलो. यातून आवश्यक सूक्ष्म जीवजंतू व कीटकांच्या वाढीसाठी शेतजमीन अधिकाधिक अनुकूल होत गेली. जमिनीच्या सुपीकतेसाठी हे सारे घटक महत्त्वाचे असतात. यातून मी भरघोस पीक घेऊ शकलो', असे पाटीदार यांनी सांगितले. 'भरघोस पिकांसाठी व शेतजमिनीचा कस वाढण्यासाठी गायीच्या पंचगव्याचा (दूध, तूप, दही, शेण, मूत्र) सढळ वापर करा, असे मी सर्वांना नेहमी सांगत असतो', असेही ते म्हणाले. पुढील वर्षापासून अभ्यासक्रम? कृषी विद्यापीठांमध्ये कृषी व फलोत्पादन विषयांतील विविध पदव्यांचे अभ्यासक्रम घेतले जातात. परंतु आम्ही ज्या अभ्यासक्रमाची आखणी करत आहोत तो नैसर्गिक, पारंपरिक व गायीवर आधारित आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. केंद्रीय कृषी संशोधन परिषदेने नियुक्त केलेल्या या समितीत ते उच्चशिक्षित कृषितज्ज्ञांसोबत काम करणार आहेत. या समितीने सरकारला दोन महिन्यांत अहवाल द्यायचा आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळा, कॉलेजे व विद्यापीठात हा अभ्यासक्रम समाविष्ट केला जाण्याची शक्यता आहे. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33KZn83
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments