Also visit www.atgnews.com
Central Railway Recruitment: दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत बंपर भरती
Central Railway Apprentice Recruitment 2022: सेल (आरआरसी), मध्य रेल्वे, मुंबईने अप्रेंटिस भरतीसाठी योग्य उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. सेंट्रल रेल्वेने (Central Railway) एकूण २४२२ अप्रेंटिस पदांसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत १६ फेब्रुवारी २०२२ आहे. Central Railway Apprentice Recruitment 2022: शैक्षणिक योग्यता कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून उमेदवारांनी किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण केलेली असावी, यासह नॅशनल काऊन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगमधून नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC)किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मिळवलेले असावे. पदांचा तपशील: मुंबई : १६५९ भुसावळ : ४१८ पुणे : १५२ नागपूर : ११४ सोलापूर : ७९ वयोमर्यादा किमान १५ वर्षे आणि कमाल २४ वर्षे वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात. वयाची गणना १७ जानेवारी २०२२ च्या आधारे होईल. SC/ST उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत मिळेल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सवलत मिळेल. Central Railway Recruitment 2022 : निवड प्रक्रीया उमेदवारांची निवड दहावीतले गुण आणि ITI मधल्या गुणांच्या आधारे होईल. त्यानंतर प्रमाणपत्र पडताळणी केली जाईल. Central Railway Recruitment 2022 : अर्ज शुल्क जनरल आणि ओबीसी प्रवर्ग : १०० रुपये अर्ज शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि एसबीआय चलान द्वारे करता येईल. Central Railway Recruitment 2022 Apply Online: असा करा अर्ज योग्य उमेदवारांनी आरआरसी सेंट्रल रेल्वेची अधिकृत वेबसाइट (www.rrccr.com) च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. उमेदवारांकडे आधार कार्ड असायला हवे. नोंदणीच्या वेळी १२ अंकी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. आपले रंगीत छायाचित्र आणि अन्य प्रमाणपत्र देखील अपलोड करावे लागतील. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ फेब्रुवारी २०२२ आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FLeaNk
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments