'आरटीई'चे प्रवेश यंदाही लांबणीवर? शाळांची नोंदणी न झाल्याचा परिणाम

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'शिक्षण हक्क कायद्यां'तर्गत () देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी अद्याप शाळांची नोंदणी सुरू न झाल्याने यंदाही '' प्रवेश लांबणीवर पडणार आहेत. शाळांची नोंदणी होऊ न शकल्याने एक फेब्रुवारीपासून सुरू होणारे प्रवेश आता एक ते दीड महिना लांबण्याची भीती आहे. 'आरटीई' प्रवेशांची शाळा नोंदणीची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करायची होती. परंतु, अद्याप शाळांची नोंदणी सुरू न झाल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात २५ टक्के प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी २८ डिसेंबर ते १७ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये करण्यात यावी; तसेच त्यासाठी जास्तीत जास्त १५ दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात यावा, अशा सूचना संचालकांकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, ही प्रक्रिया अजून पूर्णच झालेली नाही. जोपर्यंत सर्व शाळांची नोंदणी होत नाही, तोपर्यंत प्रवेशांच्या जागांची निश्चिती केली जात नाही. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालक अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे शाळांची नोंदणी करायला इतकी दिरंगाई का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत पात्र असलेल्या शाळांची १०० टक्के नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांची असेल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले होते. अद्याप एकाही शाळेची नोंदणी झाली नसल्याने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जबाबदारीवरून टोलवाटोलवी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवणारी 'एनआयसी' संस्था प्रवेशाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्राथमिक शिक्षण संचालनालयातील काही अधिकाऱ्यांनी केला आहे. प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी असणारे काही अधिकारी आणि कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आले आहेत, असेही सांगितले जात आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या जबाबदारीवरून टोलवाटोलवी सुरू झाल्याचे चित्र आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3G5kM9p
via IFTTT

Post a Comment

0 Comments