राज्यातली १०० हून अधिक अनुदानित महाविद्यालये नॅकपासून दूर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद राज्यात शंभरपेक्षा अधिक महाविद्यालयांनी स्पापनेपासून एकदाही केलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अशा महाविद्यालयांची संख्या ११ आहे. शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा कळावा, यामुळे सर्व महाविद्यालयांना नॅक बंधनकार करण्यात आले. मात्र, महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जाते. शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून महाविद्यालयाला गुणवत्तेनुसार दर्जा दिला जातो. विद्यार्थ्यांना कॉलेज निवडताना मदत व्हावी, कॉलेजांचा दर्जा निश्चित केला जावा. या हेतूने नॅक मूल्यांकन केल्या जाते. विद्यापीठ अनुदान अयोगाकडून नॅक मूल्यांकन महाविद्यालयांना बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार राज्य शासनाने ही पाऊले टाकली. उच्च शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना सूचना दिल्या. राज्यात विनाअनुदानित महाविद्यालयांपैकी अनेक नॅक करून घेत नाहीत. मात्र, शासनाचे अनुदान मिळवणारे अनेक महाविद्यालयेही या प्रक्रियेपासून दूर आहेत. राज्यातील अशा महाविद्यालयांवर कारवाईबाबत अनेकदा उच्च शिक्षण विभागाने पत्र दिले. परंतु त्यानंतरही अनेक महाविद्यालये नॅक मूल्यांकनाला सामोरे गेलेले नाहीत. उच्च शिक्षण विभाग संचालकांनी अशा महाविद्यालय प्राचार्यांची ऑनलाइन बैठक घेतली. नॅक मूल्यांकनाबाबत आढावा घेत, अडचणी काय, कार्यवाही काय केली याचा आढावा घेण्यात आला. शंभरपेक्षा अधिक महाविद्यालयांचे प्राचार्य यात सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. अनुदानित महाविद्यालयांमध्ये उदासीनता असल्याने इतर महाविद्यालयांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यातील उच्च शिक्षण विभागाच्या गुणवत्तेचा प्रश्न समोर येतो. त्यात मूल्यांकनापासून दूर जाणारे महाविद्यालयेही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मार्चपर्यंत मुदत अशासकीय अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन व मानांकन करण्याबाबत उच्च शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही अनेक महाविद्यालये प्रक्रियेपासून दूर आहेत. आता या महाविद्यालयांना ३१ मार्च २०२२ची डेडलाइन दिल्याचे कळते. प्रशासकीय पातळीवरून महाविद्यालयांवर कारवाई होत नसल्याने अनेक महाविद्यालये याकडे दुर्लक्ष करतात असेही सांगण्यात येते. नॅक मूल्यांकन न केलेली औरंगाबादमधील महाविद्यालये -राजीव गांधी महाविद्यालय, करमाड -इंद्रराज महाविद्यालय, सिल्लोड -जनता महाविद्यालय, औरंगाबाद -एकता महाविद्यालय, बिडकीन -शिवछत्रपती महाविद्यालय, पाचोड -चेतना वरिष्ठ कला महाविद्यालय, औरंगाबाद -राजर्षी शाहू महाविद्यालय, वाळूज -गोदावरी महाविद्यालय, अंबड -वैष्णवी महाविद्यालय, वडवणी -एनएसएसचे शारीरिक महाविद्यालय, बीड -शंकरराव जावळे पाटिल महाविद्यालय, लोहारा


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rUKp84
via IFTTT

Post a Comment

0 Comments