Also visit www.atgnews.com
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्र 'या' लिंकवर पाहा
Guidance: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (State Council for Educational Research and Training, SCERT) राज्यातील नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यासाठी सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्र लाईव्ह वेबिनारच्या माध्यमातून होणार असून राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन SCERT तर्फे करण्यात आले आहे. करिअर मार्गदर्शन ऑनलाइन शिबिरातील तिसरे सत्र शुक्रवार दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी संध्याकाळी ३ ते ४.३० या वेळेत होणार आहे. यावेळी 'अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यास करताना तसेच दैनंदिन आयुष्यात याचा फायदा होणार आहे. विषय - अभ्यास सवयी आणि ताणतणाव व्यवस्थापन तारीख आणि वेळ- दि २८ जानेवारी २०२२, दुपारी ०३.०० ते ०४.३० वाजेपर्यंत वेबीनारची लिंक -https://youtu.be/-I6QwT7A-8I या वेबिनारसाठी सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उपस्थित राहावे तसेच शाळांना ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o5zTtc
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments