भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, ६७ हजारपर्यंत मिळेल पगार

2021: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा ( of India, NHAI) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत (NHAI) ने भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जाहीर केले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रशासकीय विभागात एकूण ८४ जागा भरण्यात येणार आहेत. या पदभरती अंतर्गत महाव्यवस्थापक (General Manager) आणि उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. जनरल पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३७ हजार ४०० ते ६७ हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५ हजार ६०० ते ३९ हजार १०० पदापर्यंत पगार दिला जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ४ फेब्रूवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट www.nhai.gov.in वर अर्ज करता येणार आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33UCZJs
via IFTTT

Post a Comment

0 Comments